वाढीव नव्या कामांना जुन्या निविदांत मनाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - नगरपालिकांच्या जुन्या निविदांत नव्यासह वाढीव कामांचा समावेश करून त्याचा कार्यादेश काढणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. या निर्णयामळे निविदा मंजूर झाल्यानंतर काही तरी हेतू ठेवून समाविष्ठ होणाऱ्या नव्या कामांवर अंकुश राहणार आहे.

कऱ्हाड - नगरपालिकांच्या जुन्या निविदांत नव्यासह वाढीव कामांचा समावेश करून त्याचा कार्यादेश काढणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. या निर्णयामळे निविदा मंजूर झाल्यानंतर काही तरी हेतू ठेवून समाविष्ठ होणाऱ्या नव्या कामांवर अंकुश राहणार आहे.

पालिकांतून काहीही कारण सांगून होणाऱ्या जुन्याच कामांच्या निविदात होणाऱ्या नव्या कामांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. पालिकांच्या कामातील तांत्रिक अनियमितता टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने लोकलेखा समितीचा अहवाल मिळाला आहे. त्या अहवालात निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा त्या निविदेचा कार्यादेश दिल्यानंतर त्यात प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता नसलेली कामे समाविष्ठ केली जातात. त्यामुळे त्या कामांना तांत्रिक अनियमितता होत आहे. त्यामुळे शासनाने जुन्या निविदांत समाविष्ठ होणारी नवी कामे किंवा वाढीव कामे न घेण्याचा स्पष्ट आदेश दिले आहेत. ते आदेश न पाळणाऱ्या पालिकांतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. त्यामुळे जुन्या निविदात रेटून टाकली जाणारी वाढीव कामे किंवा नवीन कामे नियंत्रणात राहू शकतील. पालिका स्तरावर जुन्या निविदेत नवी कामे किंवा वाढीव कामे करण्याचे ठराव केले जातात. त्याला शासनाकडून मंजुरी घेतली जाते. 

मात्र, त्याचा कार्यादेश आधीच काढलेला असतो. त्यामुळे शासनाची परवानगी औपचारितकता होती. आता ही स्थिती बदलणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयात जुन्या निविदात नवी कामे किंवा वाढीव कामे करू नयेत, असे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाचे निर्णय... 
    प्रकल्पात वाढीव काम देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचा प्रशासकीय व तांत्रिक अहवाल घ्यावा
    मूळ प्रशासकीय मंजूर निविदात तांत्रिक मंजुरीच्या कामाचाच समावेश करण्याची दक्षता घ्यावी
    सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करू नये
    केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानेच निविदा काढाव्यात 
    निविदा प्रक्रियेत समाविष्ट कामाव्यतिरिक्त अन्य कामांचा समावेश करू नये 
    निविदा प्रक्रिया व कार्यादेश देणे या दरम्यान वित्तीय औचित्याच्या तत्त्वाचे पालन करावे

Web Title: municipal old tender oppose

टॅग्स