महिलांच्या " या ' अत्यावश्‍यक  गरजेकडे महापालिकेचे दुर्लक्षच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

जागा नसल्याने व्यवस्था नाही 
महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, बाजारपेठेत जागा उपलब्ध होत नसल्याने ही व्यवस्था करता आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, याचा पाठपुरावा मी सातत्याने करणार आहे. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 

 
सोलापूर ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फक्त महिलांसाठी अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था एकाही ठिकाणी नाही. त्यामुळे शहरातील महिलांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. 

पालकांच्या मजुरीवर सावित्रीच्या लेकींची भिस्त

महिलांची एक प्रकारे थट्टाच 
महिलांनी घराबाहेर पडल्यानंतर एक तर शरीरधर्मच पाळू नये असे महापालिकेला अभिप्रेत असावे किंवा मग घराबाहेर पडताना त्यांनी पाणीही पिऊ नये, असे वाटत असावे. दुर्दैवाने सोलापुरात हेच घडत आहे. हा प्रकार म्हणजे शहरातील महिलांची एक प्रकारे थट्टाच आहे. मोठ्या शहरांमध्ये महिला स्वच्छतागृहांची संकल्पनाच नसल्याने शहरवासीयांप्रमाणेच बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने त्यांची कुचंबणा होते. मात्र, महिलावर्ग ही व्यथा कुणाला सांगू शकत नाहीत. परिणामी, त्यांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत आहे. 

अबब... मत्स्य व्यवसायात 80 टक्के घट 

हा होतो परिणाम 
दहा-बारा तास पाणी न पिता किंवा लघवी लागली असताना ती रोखून धरल्याने महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. "युरिनरी इन्फेक्‍शन', किडनी स्टोन, लघवी थांबवून ठेवण्याचा ताबा जाणे, गर्भाशयाच्या पिशवीवर परिणाम, वृद्धापकाळात किडनी निकामी होणे, इतके गंभीर आजार त्यांच्यावर लादले जात आहेत. ज्यांना मूत्राशयाचे किंवा किडनीचे विकार आहे, त्यांना वारंवार लघवीला जावे लागते. रस्त्याने तशी सोय नसल्यास बॅकप्रेशरमुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. बाळंतपणानंतरही काही महिलांना लघवीचा त्रास होतो. नॉर्मल व्यक्तीची लघवी दिवसभर साठून राहिली तर त्याचे काय परिणाम होतात यावर संशोधन होणे बाकी आहे. असे संशोधनही भारतात होणे अपेक्षित आहे, असे मत तज्ज्ञांतून व्यक्त केले जाते. 

एका क्लिकवर समजणार लसींची माहिती 

येथे हवीत स्वच्छतागृहे 
नवी पेठ, पार्क चौक, राजवाडे चौक, मधला मारुती, भुसार गल्ली, फलटण गल्ली, टिळक चौक, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक, शांती चौक, बुधवार बाजार, अशोक चौक, सत्तरफूट रस्ता, रेल्वे स्थानक परिसर, सुपर मार्केट, सात रस्ता, जुळे सोलापूर परिसरातील विविध वर्दळीची ठिकाणे, आसरा पूल, मार्केट यार्ड परिसर यासह शहरातील प्रमुख वर्दळीची ठिकाणे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The municipality ignores this "urgent need" of women