महापालिका करणार 36 व्हेंटीलेटर खरेदी...स्थायीची मान्यता : खासगी रुग्णालयांना देण्यास विरोध 

बलराज पवार
Thursday, 27 August 2020

सांगली-  महापालिकेने कोविड रुग्णांसाठी एक कोटी रुपयांची 36 व्हेंटिलेटर खरेदी करण्यास आज स्थायी समितीच्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयांना ही व्हेंटिलेटर देण्यास सदस्य राजी झाले. मात्र खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यास त्यांनी विरोध दर्शवला. 

सांगली-  महापालिकेने कोविड रुग्णांसाठी एक कोटी रुपयांची 36 व्हेंटिलेटर खरेदी करण्यास आज स्थायी समितीच्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयांना ही व्हेंटिलेटर देण्यास सदस्य राजी झाले. मात्र खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यास त्यांनी विरोध दर्शवला. 

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची व्हेंटीलेटरअभावी हेळसांड होत आहे. व्हेंटीलेटर बेड नसल्याने रुग्णांचा जीव जाण्याचे प्रकार घडल्याने महापालिकेने तातडीने व्हेंटीलेटर खरेदी करावित अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली होती. तर महापालिकेने आदीसागर भवनमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरु केले आहे. तेथे. ऑक्‍सिजन बेड आहेत. मात्र व्हेंटीलेटर बेड नसल्याने त्याची सोय करण्याची मागणीही होत होती. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी एक कोटी रुपयांची तरतूद करुन व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेतला होता. यातील काही महापालिकेच्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये बसवण्याचा त्यांचा विचार आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांनाही व्हेंटिलेटर देऊन तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली शहरातील रुग्णांवर उपचार व्हावेत, अशी आयुक्तांची भूमिका आहे. त्याला मान्यता देण्यासाठी स्थायी समितीच्या विशेष ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले. 

सभापती संदीप आवटी यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा झाली. यामध्ये अभिजित भोसले, योगेंद्र थोरात, लक्ष्मण नवलाई, मंगेश चव्हाण यांच्यासह सर्वच सदस्यांनी व्हेंटिलेटर खरेदीला मान्यता दिली. महापालिकेच्या कोवीड रुग्णालयात व्हेंटिलटरसाठी आवश्‍यक यंत्रणा उभी करता आली तर त्याचा विचार करावा. खासगी रुग्णालयाऐवजी मिरज व सांगली सिव्हीलमध्येच व्हेटिंलेटरची बेड तयार करावेत. त्याचे नियोजन महापालिकेकडेच ठेवावे. विशेषत: शहरातील रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर उपयोगात आणावेत, अशी सूचना भोसले व इतरांनी केली. तर नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगलीप्रमाणे मिरजेतील वेअर हाऊस, मंगल कार्यालयातही 100 बेडचे कोवीड सेंटर सुरू करावे, अशी सूचना केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The municipality will purchase 36 ventilators.