आठ दिवसानंतर `या` प्रेमवीराला बेड्या

आठ दिवसानंतर  `या` प्रेमवीराला बेड्या

सोलापूर : एकतर्फी प्रेम प्रकरणातून विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपीस शनिवारी अटक केली. रजनीकांत उर्फ राजू चंद्रकांत शंके (वय 30 रा. न्यू लक्ष्मी चाळ, लक्ष्मी पेठ, सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव असून त्याची चार दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. प्रियंका उर्फ गौरी तुकाराम गोडगे (वय 25, रा. न्यू लक्ष्मी चाळ, लक्ष्मी पेठ, सोलापूर) या विवाहितेचा खून झाल्याचे एक नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती.

अरे वा ! 14 वर्षांत मिळाले एवढ्यांना जीवदान

मयत मुलीचे वडिल गोविंद कृष्णा चवरे (वय 48 रा. न्यू लक्ष्मी चाळ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिलीय. आरोपी राजू शंके हा लग्नाच्या आधीपासून प्रियंका हिचा पाठलाग करुन त्रास देत होता. प्रियंकाचा विवाह 2015 साली तुकाराम गोडगे (रा. साकत ता. परंडा, जि. उस्मानाबाद) याच्याशी झाला होता. दोघांना तीन वर्षाची श्रेया नावाची मुलगी आहे. दिवाळीसाठी प्रियांका पंधरा दिवसापूर्वी मुलीसह माहेरी आली होती. 31 ऑक्‍टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता आजारी मुलीला घेऊन प्रियांका दवाखान्यात केली होती. त्यावेळी आरोपी राजू शंके याने प्रियंकास रिक्षात बसवून केले आणि दोघांना मारहाण केली. रेल्वे लाईन जवळील यश नगर येथील रेल्वे रूळावर नेवून तिचा गळा दाबून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलिसात शंके याच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु होता. आठ दिवसांनी तो पोलिसांच्या हाती लागला आहे. राजू शंके यास न्यायालयात हजर केले. त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडी रवानगी करण्यात आली.

`या`शहरातील मिश्र भाषेची नव्यांनाही पडतेयं भूरळ

घरातून मोबाईल चोरी
दमाणीनगर परिसरातून घरातून चोरट्याने घरातून 21 हजार 500 रुपयांचा मोबाईल चोरून नेला. उमेश महादेव घडलिंग (वय 48, रा. साई कृपा चाळ दहिसर, मुंबई. सध्या दमाणीनगर, जुनी मिल कंपाउंड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली घडली. घडलिंग कुटुंबासह देवदर्शन व कार्यक्रम असल्याने सासरवाडीला गेले होते. त्यांचा मुलगा आणि मेव्हणा घरासमोरील अंगणात झोपले होते. तेव्हा चोरट्याने मोबाईल चोरून नेला.

घरासमोरून म्हैस चोरी
केगाव (ता. उत्तर सोलापूर) परिसरातून घरासमोर बांधलेली 30 हजार रुपये किमतीची म्हैस चोरीला गेली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास केगाव परिसरात घडली. विजय अर्जुन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
 

वृत्तपत्र विक्रेत्यांच ठरलं....

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा झाला आहे. अनिल शिंदे, लखन बंदपट्टे, विशाल शिंदे, सुशील शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. राम बाबूराव मंजुळे (वय 63, रा. अंबिकानगर, अनाथ आश्रम शाळेच्या शेजारी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेले भांडण आपण मिटवून घेऊ असे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे का असे म्हणून मारहाण केली. हातातील केबलने मारहाण करून जखमी केली. शिवीगाळ करून मुलांना खल्लास करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

महाराष्ट्र 

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com