सांगली : कुपवाडमध्ये तरूणावर खुनी हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कुपवाड - येथील रोहिदास चौकात तरूणावार चाकून वार करून खुनी हल्ला करण्यात आला. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. तरूण गंभीर जखमी झाला आहे. खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रवींद्र रमेश रामगडे (हनुमाननगर, कुपवाड) हा जखमी झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. 

पोलिसांनी माहिती दिली, की रामगडे हा रोहिदास चौकातील एका पानपट्टीजवळ थांबला होता. संशयित हल्लेखोर आणि त्याचा वाद झाला. त्यातून त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास रामगडे हा चौकात थांबल्याची माहिती हल्लेखोरास मिळाली. तो तिथे आला. त्यावेळी पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर हल्लेखोराने चाकूने वार केला. रवींद्र हा रक्ताच्या थारोळात पडला. त्यावेळी हल्लेखोर पसार झाला. जखमी रवींद्र यास तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला 19 टाके पडले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. 

दरम्यान,""पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पंचनामा केला. जखमी रवींद्र याचा जबाब नोंदवून संशयिताचा शोधासाठी तातडीने पथके रवाना केली. रात्री उशीरापर्यंत संशयितास अटक करण्यात आली नव्हती.'' 
.... 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder attack on youth in Kupwad

टॅग्स