कुपवाडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरूणावर खुनी हल्ला...12 जणांविरूद्ध गुन्हा

सोमवार, 29 जून 2020

कुपवाड-  पूर्ववैमनस्यातून विकास गुड्डाप्पा मोरे (वय 35, पंढरपूर रस्ता, बाबुराव मोरेनगर, मिरज) याच्यावर लोखंडी रॉड आणि काठीने खुनी हल्ला केल्याचा प्रकार कुपवाडमधील एमएसईबी रस्त्यावरील मधुसूदन डेअरीजवळ घडला. याप्रकरणी कुबेर राजपूत (मेंढे मळा, मिरज), दीपक पाटील (रा. मिरज), दीपक रामचंद्र जाधव (वय 38, दत्त कॉलनी पश्‍चिम, मिरज), रवींद्र रामा कांबळे (वय 38, इंदिरानगर, म्हाडा, मिरज) आणि अनोळखी साथीदारांविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दीपक जाधव व रवींद्र कांबळे या दोघांना अटक केली आहे.

कुपवाड ( सांगली )-  पूर्ववैमनस्यातून विकास गुड्डाप्पा मोरे (वय 35, पंढरपूर रस्ता, बाबुराव मोरेनगर, मिरज) याच्यावर लोखंडी रॉड आणि काठीने खुनी हल्ला केल्याचा प्रकार कुपवाडमधील एमएसईबी रस्त्यावरील मधुसूदन डेअरीजवळ घडला. याप्रकरणी कुबेर राजपूत (मेंढे मळा, मिरज), दीपक पाटील (रा. मिरज), दीपक रामचंद्र जाधव (वय 38, दत्त कॉलनी पश्‍चिम, मिरज), रवींद्र रामा कांबळे (वय 38, इंदिरानगर, म्हाडा, मिरज) आणि अनोळखी साथीदारांविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दीपक जाधव व रवींद्र कांबळे या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास मोरे आणि कुबेर राजपूत यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. विकास हा शनिवारी सकाळी मोपेड (एमएच 10 डीई 262) वरून घरी निघाला होता. कुपवाडमधील एमएसईबी रस्त्यावरील मधुसूदन डेअरीजवळ तो आला असताना कुबेर राजपूत आणि इतर अकरा जणांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून विकासच्या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन खाली पाडले. तेव्हा कुबेर याने त्याला "तुला जीवंत ठेवत नाही' असे म्हणत हातातील लोखंडी रॉडने, दीपक पाटील याने काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच इतर साथीदारांनी देखील विकासला मारहाण केली. खुनी हल्ल्यानंतर कुबेर आणि साथीदार तेथून पसार झाले. 

जखमी विकास याने उपचार घेतल्यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुबेर आणि साथीदारांविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार संशयित हल्लेखोरांविरूद्ध खुनी हल्ला केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्यापैकी दीपक जाधव आणि रवींद्र कांबळे या दोघांना अटक केली आहे. इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. 
दरम्यान संशयित हल्लेखोरांपैकी एकाच्या नातेवाईक महिलेने जखमी विकास मोरे व अमोल मोरे (रा. मिरज) या दोघांविरूद्ध विनयभंग केल्याची फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास मिरज एमआयडीसीजवळील अमित हेल्पलाईन सलाईन फॅक्‍टरीजवळ दोघांनी दुचाकीवरून येऊन हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार विकास व अमोलविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.