गुंडाच्या खूनप्रकरणी साथीदाराला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड - सातारा येथील पोलिस रेकॉर्डवरील संशयित अभिजित ऊर्फ नाना पवारच्या खून प्रकरणात पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत त्याच्याच साथीदाराला अटक केली. अमोल बाबूराव पोळ (वय 27, रा. राऊतवाडी-वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमोल हा सुद्धा पोलिस रेकॉर्डवरील संशयित आहे. दोघांवर पंधरापेक्षा जास्त गुन्हे संशयित आहेत. दोघेही एकत्रित चोऱ्या करत होते. चोरीतील हिस्सा न देणे, खर्चासाठी पैसे न देणे व वकिलासह जामिनाचा खर्च न केल्याबद्दल अभिजितचा खून केल्याची कबुली अमोलने दिली आहे. सातारा गुन्हे अन्वेषण व कऱ्हाड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत काल रात्री गुन्हा उघडकीस आला. 

पोलिसांनी सांगितले, की संशयित अभिजित (वय 32, रा. लिंब, ता. सातारा) याचा काल बनवडी कॉलनी येथे खून झाला. तेथील एका अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर तो भाड्याने राहत होता. तेथे त्याच्या घरात घुसून खून झाला होता. अभिजितवर वेगवेगळ्या चोऱ्यांचे सुमारे 40 गुन्हे दाखल आहेत. सातारा तालुक्‍यातून तो हद्दपार होता. चार दिवसांपासून त्या अपार्टमेंटमेध्य राहत होता. 

खुनानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. अभिजितसोबत त्याचा साथीदार अमोल पोळ काल रात्री होता. याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी त्वरित अमोलला सातारा येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना अर्धवट माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी खात्रीसाठी चौकशी केली असता तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आले. नंतर पोलिसी खाक्‍या दाखविताच अमोलने खुनाची कबुली दिली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तो अभिजितकडे आला होता. त्यांची मलकापूर फाट्यावर भेट झाली. त्यानंतर दोघांनी एकत्र दारू प्यायली. तेथून ते घरी आले. रात्री पुन्हा एका बारमध्ये जाऊन दोघेही दारू प्यायले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ते घरी आले. अभिजित झोपल्यानंतर अमोलने तेथे असलेल्या कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला आणि तो तेथून पळून गेला. 

अमोल व अभिजित दोघांवरही वेगवेगळ्या चोरींचे सुमारे पंधरा गुन्हे आहेत. त्यातील सुमारे दहा गुन्ह्यांत माझा काहीही संबंध नसताना अभिजितने मला गुंतवले होते, असे अमोलने पोलिसांकडे कबूल केले. लुटीचा हिस्सा कमी देणे, वकिलाचा खर्च न देणे व जामीन करण्याचा खर्च देण्यास टाळाटाळ करणे, असे प्रकार केले होते. म्हणूनच त्याचा खून केल्याचे अमोलने सांगितले. 

अभिजितवर 47, अमोलवर 12 गुन्हे 
अभिजित पवारवर चोरीचे 47 गुन्हे आहेत. त्यात जबरी चोरी, दरोड्याची तयारी, घरफोडी असे गंभीर गुन्हे आहेत. त्यातील बारा गुन्ह्यांत अमोल व अभिजित संशयित आहेत. अमोलवर वेगवेगळ्या चोरीचे दहा गुन्हे आहेत.

Web Title: The murder case arrested Partner