बिरवाडीत मजुराचा सहकाऱ्याकडून खून

Murder
Murder

महाबळेश्‍वर - येथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरवाडीच्या हद्दीतील वन विभागात जाळी बंधारा कामावर असलेल्या मजुराने सहकाऱ्याचा खून केला. घटनेनंतर पळून गेलेल्या संशयिताला पोलिसांना सहा तासांतच जेरबंद केले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रदीप भांबू कदम (वय 35, रा. गोळेगणीस ता. पोलादपूर) असे मृताचे नाव असून, राजू गुलाब चव्हाण (वय 45 रा. शिरस, ता. शिरूर) असे संशयिताचे नाव आहे.

वन विभागात ठिकठिकाणी जाळी बंधारे बांधण्याचे काम महेश चव्हाण या ठेकेदाराने घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बंधारे बांधण्याचे काम चालू आहे. बंधारा बांधण्यासाठी राजू व त्याची पत्नी रेणुका, तसेच प्रदीप कदम हे तिघे काम करत होते. कामाच्या ठिकाणापासून बिरवाडी हे गाव जवळ असल्याने तिघेही बिरवाडीतील समाजमंदिरात राहात होते. काल (ता. 17) राजू व प्रदीप हे दोघे काही कामानिमित्त महाबळेश्‍वरला आले होते. काम झाल्यानंतर दोघांनी देशी दारू गुत्त्यात बसून दारू घेतली. सायंकाळी बिरवाडीकडे जाताना दोघांत बाचाबाची झाली. या भांडणाच्या रागातून राजूने प्रदीपला मारहाण करण्यास सुरवात केली. या मारामारीत हाताला लागलेल्या वस्तूने राजूने प्रदीपच्या डोक्‍यावर प्रहार केला. हा सर्व प्रकार रहदारीच्या रस्त्यावर झाला. हा प्रकार उघडकीस येणार म्हणून राजूने प्रदीपचा मृतदेह ओढत चार ते पाच फूट खोल बांधावरून खाली टाकला. रस्त्यावरून सहजासहजी दिसणार नाही, अशा पद्धतीने मृतदेह टाकून राजू घरी गेला. घरी आल्यावर त्याने घडलेला प्रकार पत्नीला सांगितला. गाव सोडून पळून जाण्याची योजना तयार केली. तो गावातून पसारही झाला.

दरम्यान, राजू व प्रदीप यांच्यात मारामारी झाल्याची माहिती गावात पसरली. गावातून ही माहिती प्रदीपच्या पत्नीलाही कळाली. राजूच्या पत्नीने ही माहिती आईला सांगितली व त्यांनी ही माहिती ठेकेदाराला कळविली व जावयाचा शोध घेण्याची विनंती केली. आज पहाटे एक कामगार बेपत्ता झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक बी. ए. कांडुभैरी यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड व सहकाऱ्यांचे पथक बेपत्ता कामगाराच्या शोधासाठी बिरवाडीला पाठवले.

सकाळी साडेनऊ वाजता बिरवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर पायवाटेवर एका ठिकाणी प्रदीपच्या चप्पला आढळून आल्या. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला, तेव्हा बांधाच्या खाली चार ते पाच फूट खोल खड्ड्यात प्रदीपचा मृतदेह आढळून आला. सकाळी साडेनऊ वाजता मृतदेह मिळाल्याने प्रदीपचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबरवरून राजूचे लोकेशन शोधून काढले.

साडेअकराच्या सुमारास वाई बस स्थानकात पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com