सांगलीतील शांतिकेतन महाविद्यालयात विद्यार्थिनीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय 21, रा. कसबेडिग्रज) या विवाहित विद्यार्थिनीचा ओढणीने गळा दाबून खून करण्यात आला.

सांगली : येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय 21, रा. कसबेडिग्रज) या विवाहित विद्यार्थिनीचा ओढणीने गळा दाबून खून करण्यात आला.

वैशाली मुळीक या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार आज (रविवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आला. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वैशाली मुळीक ज्या मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत होती. त्या विद्यापीठातील एका प्राध्यापकावर संशय व्यक्त केला जात आहे. यापुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Murder of a girl student in College Sangli