कराड तालुक्यात बेपत्ता युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

उंब्रज - नविन कवठे (ता. कराड) येथील सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतदेह भुयाचीवाडी (ता. कराड) गावचे हद्दीत असणाऱ्या बंधाऱ्यात टाकण्यात आला. वैभव आनंदराव घार्गे (वय.२८ रा.नवीन कवठे ता.कराड) असे खून झालेल्या युवकाचे नांव आहे.

उंब्रज - नविन कवठे (ता. कराड) येथील सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतदेह भुयाचीवाडी (ता. कराड) गावचे हद्दीत असणाऱ्या बंधाऱ्यात टाकण्यात आला. वैभव आनंदराव घार्गे (वय.२८ रा.नवीन कवठे ता.कराड) असे खून झालेल्या युवकाचे नांव आहे.

पवन उर्फ प्रविण शामराव साळुंखे व राजु उर्फ भिकोबा मसुगडे (दोघे रा. नवीन कवठे ता. कराड) असे खुन केलेल्या संशयीताची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, वैभव घार्गे हा २५ नोव्हेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास जेवायला जातो असे सांगून घरातून निघून गेला. अशी फिर्याद वैभव याच्या वडीलांनी उंब्रज पोलिस ठाण्यात काल दिली होती. त्यानुसार उंब्रज पोलिसांनी चाैकशी सुरू केली. या तपासात दोन जणांनी वैभव यांचा खून करून मृतदेह भुयाचीवाडी येथील बंधाऱ्यात टाकल्याची माहिती  मिळाली. यावरून उंब्रज पोलिसांनी संशयित पवन उर्फ प्रविण साळुंखे (रा. नविन कवठे ता.कराड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांने या गुन्ह्याची कबुली दिली.

वैभव याने प्रविण साळुंखे यास फोन करून मला पैसे दे नाहीतर दारू दे असा तगादा लावला होता. यावेळी प्रविण याने नकार दिला मात्र वारंवार फोन करून वैभव पैशाची मागणी करू लागल्याने प्रविण याने रविवार सायंकाळी फोन करून दारू पिण्यासाठी भुयाचीवाडी येथील बंधाऱ्यावर बोलविले. प्रविण याने त्याचा साथीदार राजेंद्र मसुगडे यास वैभवला कवठे येथून घेऊन येण्यास सांगितले. 

रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वैभव, प्रविण  आणि राजेंद्र मसुगडे हे बंधाऱ्याजवळ दारू पिण्यासाठी बसले. जुन्या वाळूच्या आर्थिक व्यवहारावरुन प्रविण साळुंखे व वैभव घार्गे या दोघांमध्ये १ महिन्यापुर्वी बाचाबाची झाली होती. यावेळी वैभव याने जुन्या भांडणाचा वाद उकरून काढून वादावादी करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रविण आणि राजेंद्र यांनी दोरीच्या सहाय्याने वैभव यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बंधाऱ्यावर नेवून बंधाऱ्याला लावण्यात येणाऱ्या रिकाम्या वक्र दरवाजाला बांधून बंधाऱ्यात फेकून दिला असल्याची प्राथमिक माहिती संशयित आरोपींनी पोलिसांना दिली.

राजु उर्फ भिकोबा मसुगडे (रा. नविन कवठे) हा संशयीत आरोपी फरार असल्याचे उंब्रज पोलीसांनी सांगितले. 

Web Title: murder incidence in Bhuyachiwadi in Karad Taluka