मिरजमध्ये जुन्या बसस्थानक परिसरात एका तृतीयपंथीयांचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मिरज - येथील जुन्या बसस्थानक परिसरात एका तृतीयपंथीयांचा मंगळवारी (ता. 17) मध्यरात्रीनंतर खून करण्यात आला. गौस रज्जाक शेख उर्फ काजोल (वय 35) असे त्याचे नाव आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्यावर चाकूचे सहा ते सात वार करण्यात आले आहेत.

जुन्या बसस्थानकासमोरील एका मोठ्या खासगी इमारतीमध्ये हा हल्ला झाला. त्यानंतर हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गौस उर्फ काजोल तेथून जखमी अवस्थेत जुन्या बसस्थानकात आला. तेथून त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याचे रुग्णालयात निधन झाले. त्याच्यावर हल्ला करणाऱ्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत.

जुन्या बस स्थानक परिसरात रात्रभर तृतीयपंथी आणि लुटारूंचा सतत वावर असतो यातूनच बऱ्याच वेळा सामान्य प्रवासी आणि नागरिकांची लुटमार होते. या परिसरातील फेरीवाले अवैध प्रवासी वाहतूक करणारे वडाप चालक यासह लुटारूंच्या टोळ्यांचा या परिसरातील उपद्रव ही पोलिसांची मोठी डोकेदुखी आहे .सहाजिकच याठिकाणी खुन, मारामाऱ्या ,लुटमार अशा घटना वारंवार घडत आहेत. या खुनाची याप्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder incidence Near Miraj Bus stand