विद्यार्थिनी खून प्रकरण : पतीचाही खुनात सहभाग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मिरज - कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वैशाली रामदास मुळीक हिच्या खुनात तिचा पती रामदास मुळीक याचाही सहभाग असल्याचा आरोप वैशालीचे वडील तानाजी अप्पासाहेब नलवडे (रा. मल्लेवाडी, ता. मिरज) यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांना दिले. 

शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या एका वर्गात वैशालीचा गळा आवळून खून झाला. याप्रकरणी प्रा. ऋषिकेश मोहन कुडाळकर याने प्रेमसंबंधातून खूनाची कबुली दिली.  

निवेदनात म्हटले आहे, की वैशालीचा चार वर्षांपूर्वी कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील रामदास मुळीक याच्याशी विवाह झाला. दोघांत वारंवार वाद होत. वादातून त्याने वैशालीस मारहाणही केली. त्यानंतर मध्यस्थी केली. दोन महिन्यांपूर्वीही पुन्हा भांडण झाले. त्यानंतर वैशालीला मल्लेवाडी येथे माहेरी आणले होते.

रामदास हा चांगल्या प्रवृत्तीचा नसल्याने सासरी जाणार नसल्याचे वैशालीने सांगितले; पण तिची समजूत घालून सासरी पाठवले. ऋषिकेश कुडाळकर आणि रामदास मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळकर केबल बसवण्यासाठी वैशालीच्या घरी आला होता. त्यावेळी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले होते. त्याकडेही रामदास आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. रामदास आणि ऋषिकेश यांनी संगनमत करून वैशालीचा खून केला. वैशालीच्या चारित्र्यावरही घेतला जाणारा संशय चुकीचा असून याबाबतचे सर्व आरोप खोटे आहेत. या खूनप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Web Title: Murder incidence in open University follow up