खानापूर तालुक्यातील युवकाचा धारदार शस्त्राने खून

दिलीप कोळी
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

सागर भेंडवडे येथील बालाजी करांडे हा तरूण रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. यानंतर जखमी बालाजी याला ग्रामस्थांनी तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विटा ( सांगली )  - एका तरूणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना काल ( ता.६) रात्री नऊच्या सुमारास साळशिंगे ( ता. खानापूर ) येथे उघडकीस आली. बालाजी किसन कारंडे ( वय २७, रा. सागर भेंडवडे, ता. खानापूर ) असे त्याचे नांव आहे. विटा येथे त्याचे मोबाईल शाॅपीचे दुकान आहे.

कोल्हापुरातील भास्कर डाॅन टोळीतील संशयिताच्या घराची झडती 

काल ( ता.६ ) साळशिंगे परिसरातील ओढ्याजवळ एक तरुण गाडीवरून पडल्याचा निरोप भेंडवडे येथील ग्रामस्थांना एका प्रवासी महिलेने दिला. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता सागर भेंडवडे येथील बालाजी करांडे हा तरूण रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. यानंतर जखमी बालाजी याला ग्रामस्थांनी तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मणीमंगळसुत्र मोडून उभारलेली द्राक्षबाग पावसामुळे मातीमोल 

उजव्या काखेत खोलवर धारदार शस्त्राने वार

यानंतर बालाजी करांडे याचा अपघाती मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. आज ग्रामीण रूग्णालय विटा येथे सकाळी करांडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बालाजी करांडे याच्या उजव्या काखेत खोलवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला असल्याचे उघड झाले. उजव्या बाजूने केलेला हा वार फुफ्फुसात दोन इंचापर्यंत गेल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावर आता अशी आहे वेगमर्यादा

रस्त्याकडेला गाडीसोबत दिले ढकलून

बालाजी याचे विटा येथे खानापूर रस्त्यावर साई मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. बुधवारी बालाजी नेहमीप्रमाणे आपली मोबाईल शॉपी बंद करून विट्यातून आपल्या गावी सागर भेंडवडेकडे निघाला होता. साळशिंगे येथे त्याच्यावर खूनी हल्ला करून त्याला जखमी अवस्थेत रस्त्याकडेला गाडीसोबत ढकलून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोडामार्ग तालुका गोव्यात विलिनकरण्याच्या चर्चेचे अंतरग संबंधीत बातम्या :

विशाल गोमंतक, कोकण राज्य या मागणीत दडलयं काय ?

गोव्याला या भूभागाची गरज आहे का?
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Incidence In Salshinge Khanapur Taluka