मिरजमध्ये सासऱ्याच्या मारहाणीत जावयाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

सांगली - मिरज तालुक्यातील सावळीमध्ये सासऱ्याने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाला. मुलीला मारहाण केली म्हणून सासऱ्याने जावयाला डाबाला बांधून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. 

सांगली : मिरज तालुक्यातील सावळीमध्ये घरगुती वादात पतीचा मृत्यू झाला. या घटनेत सासऱ्याने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू तर जावयाने केलेल्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.  

याबाबात मिळालेली माहिती अशी की, सावळीमध्ये काल जत्रा होती. या जत्रेसाठी ज्ञानेश्वर आणि गीतांजली बामणे हे दोघे आले होते. यावेळी ज्ञानेश्वर व गीतांजली यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. यातून ज्ञानेश्वर यांनी गीतांजलीस मारहाण केली. मुलीला जावई मारहाण करतो हे पाहून अण्णासाहेब शिंदे यांनी जावयाला याचा जाब विचारला. त्यांनतर अण्णासाहेब यांनी जावई ज्ञानेश्वर यास डांबाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत जावई गंभीर जखमी झाला. गीतांजलीही गंभीर जखमी झाली होती. या दोघांना मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाला. दरम्यान गीतांजली अत्यावस्थ आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Murder incidence in Savali in Miraj Taluka