मद्यपी पतीची डोक्यात दगड घालून हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

एक नजर

  • मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीचा डोक्यात दगड खून.
  • इचलकरंजीनजीक यड्राव येथील घटना. 
  • शिवाजी विठोबा देवेकर (वय 48) असे मृत व्यक्तीचे  नाव
  • याप्रकरणी शहापूर पोलिसांकडून पत्नी गीता देवेकर हिला अटक. 

इचलकरंजी -  मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना इचलकरंजीनजीक यड्राव येथे  घडली. शिवाजी विठोबा देवेकर (वय 48) असे  मृत व्यक्तीचे  नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी पत्नी गीता देवेकर हिला अटक केली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  यड्राव सुतगिरणीसमोरील आर. के .नगरमध्ये राहणारे शिवाजी हे मेंडिंगचे काम करत होते. ते वारंवार मद्यपान करून पत्नी गीता हिच्याशी भांडण करत होते. यामुळे एकाच घरात शिवाजी आणि गीता मुलासह स्वतंत्र खोलीत राहत होते. तरीही त्यांच्यात वारंवार वाद होत होता. या वादातूनच काही महिन्यांपूर्वी गीता आणि मुलगा अशितोष यांनी शिवाजी यास बेदम मारहाणही केली होती. तरीही आज पुन्हा शिवाजी मद्यपान करून गीता हिला शिवीगाळ करत होता. यावरून गीता यांनी शिवाजीला बॅटनपट्टीनं बेदम मारहाण सुरू केली. शिवाजीने प्रापंचिक साहित्याची मोडतोड सुरू केली. यासाठी  गीता आणि अशितोष यांनी त्याला घराबाहेर ढकलून दिले. हा गोंधळ पाहून नागरीकांनीही वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

गीता हिने शिवाजी जमिनीवर पडल्याची संधी साधून त्याच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गीता आणि अशितोष दोघांनीही शहापूर पोलीसात हजर होऊन हत्येची कबुली दिली. पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह पथकाने  घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, उपाधिक्षक गणेश बिरादार यांनीही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder incidence in Yadrav Ichalkarani