व्हॉटस्‌ ॲप स्टेटस बेतले जिवावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

एक नजर

  • इस्लामपूर  येथे  व्हाट्‌सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून खुनी हल्ला
  • बाचाबाचीनंतर नऊ जणांचा खुनी हल्ला 
  • विक्रांत बापू क्षीरसागर (रा. ताकारी) हा युवक गंभीर जखमी
  • एस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी सायंकाळी साडे चारच्या  सुमारास हल्ला

इस्लामपूर - व्हाट्‌सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर नऊ जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात विक्रांत बापू क्षीरसागर (रा. ताकारी) हा युवक गंभीर जखमी झाला. येथील एस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी सायंकाळी साडे चारच्या  सुमारास हा हल्ला झाला.

समाजमाध्यमावरील खुन्नस जीवावर बेतली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. याबाबत एजाज अय्याज पटेल यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अजित पाटील, प्रतीक  पाटील, शुभम माने, संग्राम जाधव, केवल परदेशी, विश्वजित पाटील, रणजित हणमंत पाटील, रोनक परदेशी, नेभळ्या (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. इस्लामपूर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यातील शुभमला पोलिसांनी अटक केली असून त्याला ११ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, व्हॉट्‌सॲपचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून विक्रांत व प्रतीकची बाचाबाची झाली होती. त्यानंतर अजितने विक्रांतला  जिवंत ठेवायचे नाही, खल्लास करायचे असे म्हणून फ्राय पॅनने विक्रांतच्या पाठीवर मारले. प्रतीक पाटील याने त्याच्या हातातील सोडा वॉटरच्या बाटलीने तर शुभम माने याने काठीने विक्रांतला मारहाण केली. तसेच संग्राम जाधव, केवल परदेशी, विश्वजित पाटील, रणजित हणमंत पाटील, रोनक परदेशी, नेभळ्या यांनी विक्रांतला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यावेळी एजाज भांडण सोडवण्यास गेले असता त्याच्या डाव्या हातावर फ्रायपॅन मारून तेही जखमी झाले. 

Web Title: Murder in Islampur on Whats app status