आईचा खून केल्याप्रकरणी आटपाडीतील एकास जन्मठेप

आईचा खून केल्याप्रकरणी आटपाडीतील एकास जन्मठेप

सांगली - शिवीगाळ केल्याच्या कारणातून आईचा खून केल्याप्रकरणी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, आटपाडी)  याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, की फिर्यादी राजेंद्र चव्हाण (रा. कौठूली, ता. आटपाडी) यांचा झाडे तोडून त्यापासून कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. 

आरोपी वसंत वाघमारे हा त्यांच्याकडून मजुरीवर काम घेऊन काम करत होता. वसंत याला दारूचे व्यसन होते. ४ मार्च २०१८ रोजी सकाळी साडेदहा वाजता राजेंद्र चव्हाण हे त्यांच्या सासऱ्यांसमवेत कामावर चालले होते. ते कामगाराच्या म्हणजे वसंत वाघमारेच्या झोपडीजवळ गेले असता वसंत दारूच्या नशेत पडलेला त्यांना दिसला. त्यांच्या शेजारी त्याची आई राणी वाघमारे जखमी अवस्थेत पडलेल्या दिसल्या. राजेंद्र चव्हाण यांनी याबाबत वसंतला विचारले. ‘दारू पित असताना आईने शिवीगाळ केली. म्हणून मीच कोयत्याने तिला मारले,’ अशी कबुली वसंतने दिली. 

राजेंद्र चव्हाण यांनी शेजारच्या लोकांच्या मदतीने राणी यांना दवाखान्यात नेले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला. याप्रकरणी वसंतवर आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने वसंतला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला हवालदार गणेश वाघ, रमा डांगे, वंदना मिसाळ यांनी 
सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com