निपाणीत हॉटेल मालकाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

निपाणी - पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर प्रतिभानगराजवळ असलेल्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या हॉटेल शेजारी हॉटेल मालकाचा निर्घृण खून झाल्याची घटना आज (गुरुवारी) सकाळी उघडकीस आली.

रमेश सदाशिव चौगुले (वय 46, रा. हुडको कॉलनी, निपाणी) असे मयताचे नाव आहे. हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कामावर येण्यास तयार असलेल्या आकाश हरीभाऊ कुलकर्णी (वय 40, रा. मूळगाव आडी, ता. चिक्कोडी) यांच्यावरही खुनी हल्ला झाला आहे. त्यामध्ये ते गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे निपाणी शहरात खळबळ उडाली आहे.

रमेश चौगुले हे बऱ्याच वर्षापासून चारचाकी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होते. दीड वर्षापूर्वी प्रगतीनगर शेजारी महामार्गाला लागूनच मोठी जागा भाडे तत्त्वावर घेऊन त्याठिकाणी हॉटेलसह लॉजिंगचे बांधकाम त्यांनी सुरु केले होते. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असताना चौगुले ही घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रमेश चौगुले हे हुडको कॉलनीत आपली पत्नी नेहा व दोन मुलांसह रहात होते. हॉटेल बांधकामाच्या ठिकाणी ते दिवस-रात्र थांबत होते. बुधवारी रात्री त्यांच्या मित्रासमवेत एका खोलीत मद्यप्राशन करत बसले होते. घटनास्थळी मद्याच्या बाटल्या, ग्लास दिसत होते. त्यानंतर काही वेळातच आर्थिक देवघेव किंवा अन्य मोठ्या कारणामुळे चौगुले व संशयितांमध्ये झटापट झाली. संशयित आरोपींनी चौगुले यांच्या डोक्‍यावर धारदार हत्त्याराने वर्मी घाव घातल्याने चौगुले हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. आकाश कुलकर्णी यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित आरोपींनी कुलकर्णी यांच्यावरही हल्ला चढविला. त्यामुळे कुलकर्णी हे सुद्धा रक्तबंबाळ झाले. कुलकर्णी हे दुसऱ्या खोलीत रक्तबंबाळ असल्याचे सकाळी 9.30 वाजता दिसून आले. त्यामुळे तात्काळ नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर व पोलिसांनी पुढाकार घेऊन कुलकर्णी याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

गुरुवारी सकाळी रमेश चौगुले हे घराकडे न आल्याने त्यांची पत्नी नेहा हिने त्यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे घाबरून नेहा थेट हॉटेल बांधकामाच्या ठिकाणी पोहोचल्या. खोलीचे दार उघडताच चौगुले हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी आक्रोश केल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर फौजदार सुनील पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. 

रमेश चौगुले यांचे मूळ गाव गिरगाव (ता. चिक्कोडी) असून त्यांचे वडील देवचंद महाविद्यालयात रजिस्ट्रार म्हणून कार्यरत होते. तेंव्हापासून चौगुले कुटुंबीय निपाणीत स्थायिक होते. रमेश यांच्या मागे पत्नी, भाऊ, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: murder in nipani

टॅग्स