शेतातून पाईपलाईन नेल्याच्या वादातून खून

राजेंद्र सावंत
मंगळवार, 24 जुलै 2018

पाथर्डी (नगर) : शेतातुन पाईपलाईन नेल्याच्या रागातुन केशव दशरथ जऱ्हाड (वय 50, रा. चिचोंडी) यांचा संजय पेंटर उर्फ संजय पेत्रस भिंगारदिवे याने धारदार शस्त्राने व दगडाने मारुन खुन केला आहे. सोमवारी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून संजय भिंगारदिवे याला ताब्यात घेतले आहे.

केशव जऱ्हाड व संजय भिंगारदिवे यांचे शेत शेजारी-शेजारी आहे. भिंगारदिवे शेतातच राहतो. केशव जऱ्हाड यांची पाईपालाईन संजय भिंगारदिवेच्या चुलत्याच्या शेतातुन गेली होती. यावरुन दोन महिन्यापासुन दोघांमधे वाद होता. 23 जुलैला योगेश जऱ्हाड याला अरुण तुपे याने भ्रमणध्वनीवरून कळविले की केशव जऱ्हाड यांना संजय भिंगारदिवे याने मारले आहे. योगेशने त्याचा भाऊ प्रमोद जऱ्हाड याला माहीती दिली. खारोळ्याच्या तळ्याजवळ केशव ज-हाड हे मयत झालेले आढळुन आले. ज-हाड यांचा शर्ट रक्ताने माखलेला होता. त्यांच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केलेला होता. एक हात दगडाने जखमी केलेला होता. रक्ताने माखलेला दगड दोनशे मीटर अतंरावर पडलेला होता. जवळच संजय पेंटर जखमी अवस्थेत होता.

प्रमोदला पाहील्यानंतर संजय पळु लागला. त्याचा पाठलाग केला असता तो घरात जाऊन पडला होता. त्याला विचारले असता तो काही  बोलला नाही. पोलिसांना माहीती दिली. याबाबत मयताचे पुतणे प्रमोद जनार्धन ज-हाड याने पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संजय भिंगारदिवे (रा.चिचोंडी) याला ताब्यात घेतले आहे. जखमी असलेल्या संजय भिंगारदिवेला अहमनगर येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर पाथर्डीला आणले आहे.

Web Title: murder for pipeline passes through farm

टॅग्स