तडीपार गुंडाचा सांगलीत निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

सांगली - तडीपारीच्या आदेशाचा भंग करून भावाच्या वाढदिवसासाठी शहरात आलेला गुंड रवींद्र ऊर्फ रवी शहाजी माने (वय 33, रा. अहिल्यानगर) याचा आज भरदिवसा सत्तूरने डोक्‍यात वार करून निर्घृण खून करण्यात आला. हल्ल्यात रवीचा साथीदार भोराप्पा शिवाजी आमटे (24, रा. अहिल्यानगर) जखमी झाला. हल्ल्याच्या भीतीने रवीचे आणखी दोन साथीदार दुचाकी टाकून पळाले. भर दुपारी सव्वा दोन वाजता कलानगर येथील दत्त मंदिराजवळ थरार घडला. पूर्ववैमनस्यातून बाब्या शिंदे, म्हाळू (पूर्ण नाव नाही) आणि साथीदारांनी हल्ला केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी - गुंड रवी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर मारामारीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. दरम्यान, रवीचा भाऊ राहुलचा आज वाढदिवस होता. राहुल प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो. अहिल्यानगर येथे कार्यकर्त्यांसमवेत राहुलचा वाढदिवस करण्याचा बेत रवी आणि साथीदारांनी रचला. त्याप्रमाणे कालपासूनच परिसरात राहुलचे डिजिटल फलक लावले होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास रवी अहिल्यानगर येथे आला. वाढदिवसासाठी स्टेज आणि मंडप आवश्‍यक होता. त्याच्या शोधासाठी रवी आणि साथीदार भोराप्पा आमटे, धनाजी बुदनूर, इमाम शेख चौघे दुचाकीवरून बाहेर पडले. कारखाना परिसरात चौकशी केली. तेथे स्टेज, मंडप उपलब्ध नसल्यामुळे चौघे दुपारी जुना बुधगाव रस्त्यावरून कलानगरला माळी मंडप डेकोरेशनकडे निघाले. 

चौघेजण कलानगरकडे वळत असताना बाब्या शिंदे आणि साथीदारांनी त्यांना पाहिले. पूर्ववैमनस्यातून रवीला मारण्याचे त्यांनी ठरवले. काळ्या रंगाच्या कारमधून पाच-सहाजण कलानगरमध्ये दबा धरून बसले. रवी आणि साथीदारांनी स्टेज, मंडपचे भाडे ठरवून घेतले. टेम्पोत साहित्य भरल्यानंतर चौघे दुचाकीवरून निघाले. भोराप्पा दुचाकी (एमएच 10 बीएफ 8103) चालवत होता. रवी मागे बसला होता. त्यांच्या मागे टेम्पो होता. टेम्पोच्या मागे रवीचे साथीदार धनाजी, इमाम होते. 

दत्त मंदिरजवळ बाब्या शिंदे आणि साथीदारांनी वेगाने मोटार पुढे आणली. टेम्पोला ओव्हरटेक करून रवीच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर रवी दुचाकीवरून उडून बाजूला मोकळ्या जागेत पडला. चालक भोराप्पा देखील दुचाकीवरून पडून बेशुद्ध झाला. तेवढ्यात मोटारीतून सत्तूर, तलवारीसारखी शस्त्रे उगारून रवीवर हल्ला चढवला. रवी पळता-पळता पडला. तेव्हा त्याच्या डोक्‍यात सत्तूरने तीन जोरदार वार केले. कवटी फुटून तो जागेवर मृतावस्थेत पालथा पडला. भोराप्पा शुद्धीवर येऊन पळत असताना त्याच्यावरही एकाने वार केला. डोक्‍याला मागे निसटता वार झाला. तशातही तो पळाल्यामुळे बचावला. तेवढ्यात मागून रवीचे साथीदार धनाजी, इमाम आले. परंतु हल्लेखोरांच्या हातातील शस्त्रे पाहून दुचाकी टाकून दोघे पळाले. रवी मृत झाल्यानंतर हल्लेखोर मोटारीत बसून पसार झाले.

Web Title: Murder in sangli