सांगली: इस्लामपुरात पाटकऱ्याचा डोक्‍यात गज घालून खून 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

प्रशांतने अशोक पाटील यांच्या डोक्‍यात गज घालून खून केला

इस्लामपूर  (जि. सांगली) : आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी शेतात पाणी गेल्याचे निमित्त करत आज प्रशांत बाबुराव पाटील याने पाटकरी अशोक आनंदा पाटील यांचा खून केल्याची घटना घडली. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास-नवेखेड रस्त्यावरील शेतात हा प्रकार घडला. प्रशांतने अशोक पाटील यांच्या डोक्‍यात गज घालून खून केला. घटनेनंतर अशोक फरारी आहे. घटनेची इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद आहे. अजित रामचंद्र पाटील यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी अजित रामचंद्र पाटील (रा. कोरेगाव) यांची बहीण जयश्री वसंतराव पाटील (रा. इस्लामपूर) यांच्यासह इतर 17 शेतकऱ्यांनी मिळून बोरगाव येथून नदीवरून शेतीसाठी इरिगेशन पाईपलाईन आणली आहे. इस्लामपूर नवेखेड रस्त्यावर नवरा-नवरी नावाच्या परिसरात ही जमीन आहे. त्याच्यावर देखरेखीसाठी मृत अशोक आनंदा पाटील यांची पाटकरी म्हणून नेमणूक केली होती. अजित पाटील यांनी बहिणीचे शेत कसण्यासाठी घेतले होते. या शेतात पाटकरी अशोक पाटील पाणी पाजत असत. मारेकरी प्रशांत पाटील यांचे वडील बाबुराव भगवान पाटील यांच्याशी शेतात पाणी जाण्याच्या कारणावरून रविवारी (ता. 31) वाद झाला होता. दुपारी बाराच्या सुमारास अजित पाटील शेतात आले होते. दरम्यान या परिसरातील शेतकरी बाबुराव बबन पाटील त्या शेतातून जात असताना अशोक पाटील याला तू नीट पाणी पाजत जा, तू मुद्दामहून वाटेत पाणी सोडतोस असे म्हणत शिवीगाळ केली. हा वाद अजित पाटील यांनी मध्यस्थी करून सोडवला होता.

हे पण वाचाGood News-कोल्हापुरातून मुंबईला पोहोचता येणार आता फक्त सहा तासात

 

दुसऱ्या दिवशी 11 वाजता अजित यांना फोनवरून प्रशांत व अशोक पाटील यांच्या भांडणाची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहिले असता शेतात अशोक पाटील जखमी अवस्थेत मृत असल्याचे आढळले. त्यामुळे आदल्या दिवशीच्या भांडणाचा राग मनात धरून प्रशांत पाटील याने आज सोमवारी (ता. 1) पाटकरी पाटील यांच्याशी शेतात पाणी आल्याचे निमित्त काढून वाद घातला. यात प्रशांतने पाठीमागून पाटकरी अशोक पाटील यांच्या डोक्‍यात गज घालून निर्घृन खून केला आणि त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. इस्लामपूर पोलीस फरारी प्रशांत याचा शोध घेत आहेत. 

हे पण वाचापाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून निर्दयपणे केलेल्या हत्येविरोधात मुलींचा आक्रोश

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in sangli islampur sangli crime news