साताऱ्यात विवाहितेचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सातारा - पूर्वीचे प्रेमसंबंध असताना दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून विवाहितेचा खून केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी आज चिंचणेर वंदन येथील युवकास अटक केली. ही विवाहिता 30 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. तिच्या शोधात आलेल्या बारामती पोलिसांमुळे या खुनाचा छडा लागला. तीनच महिन्यांपूर्वी या युवतीचा बारामती येथे विवाह झाला होता.

सिद्धार्थ ऊर्फ बारक्‍या दयानंद दणाणे (वय 24) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने सौ. अरुणा दत्तात्रय मोहिते (वय 21) हिच्या डोक्‍यात दांडक्‍याने मारहाण करून तिचा खून केला. तसेच तिचा मृतदेह ठोसेघरजवळ पवनगाव (ता. सातारा) येथे निर्जनस्थळी टाकून दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणा हिचा तीन महिन्यांपूर्वी दत्तात्रय मोहिते यांच्याशी विवाह झाला होता. दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. "साताऱ्याला मैत्रिणीला भेटायला जाते,' असे सासरी सांगून 30 नोव्हेंबर रोजी ती घराबाहेर पडली होती. साताऱ्यात आल्यानंतर ती सिद्धार्थबरोबर दुचाकीवरून ठोसेघरजवळ पवनगाव (ता. सातारा) येथे गेली होती. तेथील एका शिवारात, अत्यंत निर्जनस्थळी बारक्‍याने डोक्‍यात दांडक्‍याने मारहाण करून तिचा खून केला. तसेच तिचा मृतदेह काटेरी झुडुपात टाकून चिंचणेर येथे निघून आला होता.

याबाबतची फिर्याद वडगाव (ता. बारामती) पोलिसांत दिली होती. अरुणाच्या फोनचा मागोवा घेत पोलिसांनी सातारा गाठून सिद्धार्थला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने सर्व माहिती दिली असून, अरुणा हिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

Web Title: murder in satara