शिवसेना नेत्याचा सांगली जिल्ह्यातील सलगरेत खून

शिवसेना नेत्याचा सांगली जिल्ह्यातील सलगरेत खून

सलगरे - येथील सिद्धेश्‍वर मंदिराजवळील कपड्याच्या दुकानासमोर चौघा हल्लेखोरांनी शिवसेनेचे मिरज तालुका उपप्रमुख चंद्रकांत ऊर्फ पिंटू जाधव यांचा डोक्‍यात फरशी घालून खून केला. आज रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर चौघेही हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, खुनाचे कारण अस्पष्ट आहे. मिरज ग्रामीण पोलिसांत याची नोंद झाली आहे.

जाधव हे शिवसेनेचे मिरज तालुका उपप्रमुख म्हणून वर्षभरापासून कार्यरत होते. त्यांचा खासगी प्रवासी वाहतूक व जेसेबी मशीनचा व्यवसाय आहे. आज रात्री साडेनऊच्या सुमारास ते सलगरेतील एका कापड दुकानासमोर आले. त्यावेळी अज्ञात चौघे तेथे आले. त्यांच्यात बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यानंतर चौघांनी फरशीने त्यांच्या डोक्‍यात हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. साडेदहाच्या सुमारास उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. 

खून झाल्याचे समजतात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडा विरोधी पथकासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्‍वानपथकही घटनास्थळी दाखल झाले होते. पिंटू जाधव यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. खून झाल्याचे कळताच सलगरेसह परिसरात खळबळ उडाली. 

सीसीटीव्ही फुटेज हाती
सलगरेतील ज्या कापड दुकानासमोर खून झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. त्यातून चार हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याचे समजते. पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com