अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

या गुन्ह्यात आकाश ऊर्फ अक्षय नामदेव कांबळे (वय 20, रा. रविवार पेठ, सोलापूर), करण अनिल देवकुळे (वय 23, रा. रविवार पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर प्रेयसीच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात प्रेयसी वंदना सोमनाथ थोरात हिचा पती सोमनाथ थोरात, त्यांचा 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा (रा. गेंट्याल टॉकीजजवळ, सोलापूर) व इतर दोघे आरोपी आहेत. ही घटना 2 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास गेंट्याल टॉकीजच्या मागे सत्यसाई नगर येथे घडली आहे.

सोलापूर : अनैतिक संबंधाच्या कारणावरून संजय ऊर्फ संजू कल्लाप्पा साळे (वय 35, रा. गांधी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) याचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून प्रेयसीच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. इतर दोघा नातेवाइकांना अटक करण्यात आली आहे. 

या गुन्ह्यात आकाश ऊर्फ अक्षय नामदेव कांबळे (वय 20, रा. रविवार पेठ, सोलापूर), करण अनिल देवकुळे (वय 23, रा. रविवार पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर प्रेयसीच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात प्रेयसी वंदना सोमनाथ थोरात हिचा पती सोमनाथ थोरात, त्यांचा 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा (रा. गेंट्याल टॉकीजजवळ, सोलापूर) व इतर दोघे आरोपी आहेत. ही घटना 2 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास गेंट्याल टॉकीजच्या मागे सत्यसाई नगर येथे घडली आहे.

मृत संजय याचा मामा श्रीमंत गुराप्पा बंडगर (वय 45, रा. गांधी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय याने वंदना हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. वंदना हिच्याशी का संबंध ठेवतो, तिला पुन्हा भेटला तर बघ तुला खल्लासच करतो असे म्हणून लोखंडी सळईने, दगडाने मारहाण करण्यात आली होती. त्याला जखमी अवस्थेत अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीत जंगलात टाकून दिले होते. 4 जून रोजी दुपारी एकच्या सुमारास संजय यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना संजयने सोमनाथ थोरात व त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याची माहिती सर्वांना दिली होती. दरम्यान सोमवारी रात्री पावणे एकच्या सुमारास उपचारादरम्यान संजयचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आय.एस.सय्यद यांनी दिली.

Web Title: murder in Solapur