बेळगावच्या तरुणाचा कोयत्याने वार करुन खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

रेठरे बुद्रुक : कोयत्याने वार करून बेळगावच्या युवकाचा खून झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना शेरेतील (ता.कऱ्हाड) कालव्याजवळ घडली.

रेठरे बुद्रुक : कोयत्याने वार करून बेळगावच्या युवकाचा खून झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना शेरेतील (ता.कऱ्हाड) कालव्याजवळ घडली. महादेव उसूरकर (वय 30, रा. बाळे अंगली, खानापूर-बेळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. 

शेणोली स्टेशन परिसरात महादेव हा बांधकामांची कामे करत होता. काही महिन्यांपासून तो व त्याचे साथीदार त्या परिसरात राहण्यास होते. आज सकाळी शेरे येथील महिला शेतात निघाल्यावर त्यांना कालव्याजवळ एका युवकाचा मृतदेह पडल्याचे दिसुन आले. त्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांनी दिली.

माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ सहकाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. मृतदेहाजवळ एक दुचाकी आढळली आहे. खूनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of Youth by sharp weapon in shere