साताऱ्यात युवतीवर खुनी हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सातारा - शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर आज दुपारी एकतर्फी प्रेमातून एकाने युवती व तिच्या आईवर कोयत्याने खुनी हल्ला केला. यामध्ये दोघी जखमी झाल्या. दोन वेळा विनयभंगाच्या तक्रारी दाखल होऊनही पोलिस ठाण्यातच कामाला असल्याने कडक कारवाई न झाल्यानेच हल्लेखोराचे धाडस वाढल्याची चर्चा परिसरात आहे. 

हणमंत अशोक देटके (रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या हल्ल्यामध्ये मोनिका रामचंद्र दबडे (रा. मतकर कॉलनी) व तिची आई ताराबाई जखमी झाल्या आहेत. 

हणमंत याची मोनिकाच्या कुटुंबाशी ओळख होती. त्यातून त्याचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. काही दिवसांनी तो लग्न कर म्हणून मोनिकाच्या मागे लागला होता. मात्र, मोनिका त्याला नकार देत होती. त्यातून तो तिचा सतत पाठलाग करायचा. याबाबत मोनिकाने दोन वेळा शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार विनयभंगाचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले होते. 

दोन गुन्हे दाखल होऊनही त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही किंवा त्याच्या वागण्यात कोणताच फरक पडला नाही. आज सकाळी मोनिका व तिची आई धुणीभांड्यांची कामे करून घरी चालल्या होत्या. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या समोर मुख्य रस्त्यावर असलेल्या प्लायवुडच्या दुकानाजवळ हणमंतने त्यांना गाठले. लग्नास नकार देत पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून त्याने मोनिकावर कोयत्याने हल्ला केला. तो वार तिच्या डोक्‍यात बसला. या वेळी आई मध्ये पडली. त्याने त्यांनाही मारहाण केली. दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिस ठाण्यासमोरच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

हणमंत पोलिसांचा खबरी? 
हणमंत हा पोलिसांचा खबरी असल्याची चर्चा घटनेनंतर परिसरात होती. पोलिस ठाण्यात साफसफाईचे काम करून "झिरो' पोलिस असल्यासारखाच तो वावरत असायचा. गुन्हे दाखल होऊनही त्याचे काम सुरूच होते. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा धाक राहिला नव्हता. त्यातूनच त्याचे धाडस वाढल्याची शक्‍यता नागरिक वर्तवत होते. 

Web Title: Murderous attack on girl