मुस्लिम बांधव पूरग्रस्तांच्या मदतीला; बकऱ्यांची कुर्बानी न देता देणार संपूर्ण खर्च

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना विविध स्तरातून मदतकार्य केले जात आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना विविध स्तरातून मदतकार्य केले जात आहे. त्यानंतर आता उद्या होणाऱ्या ईदच्या सणाला बकऱ्यांची कुर्बानी न देता त्याचा संपूर्ण खर्च हा पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय कोल्हापूरातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

बकरी ईद उद्या (सोमवार) साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. मात्र, कोल्हापुरातील पूर परिस्थिती पाहता येथील मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार कुर्बानीचा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना दिला जाणार आहे. तसेच मुस्लिम तरुणांनी यासंदर्भात त्यांच्या समाजाला याबाबतचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, बकरी ईदला बोकड खरेदीसाठी येणारा 15-20 हजार रुपयांचा खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात यावा. इस्लाममध्ये कुर्बानीचे हेच तत्व आहे, असे या समाजाच्या तरुणांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim Community Peoples help flood victims in Kolhapur