esakal | माणसाला माणूसकीची साद; हिंदू भगिनीवर मुस्लिम बांधवांनी केले अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

माणसाला माणूसकीची साद; हिंदू भगिनीवर मुस्लिम बांधवांनी केले अंत्यसंस्कार

माणसाला माणूसकीची साद; हिंदू भगिनीवर मुस्लिम बांधवांनी केले अंत्यसंस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. मिरजेत तिने अखेरचा श्‍वास घेतला. गावांत कोरोनाची दहशत आहे. तेथील लोकांनी गावात मृतदेह आणू नका, अशी विनंती केली. या स्थितीत नात्यातील लोक दूर पळताना दिसतात. येथे मात्र मुस्लिम बांधवांना पुढे येत या हिंदू भगिनीवर अंत्यसंस्कार केले. जमियत उलेमा ए हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टने माणुसकीचे दर्शन घडवले.

कोरोना संकटात नात्यांत दुरावा आला आहे. जवळचे लोकही दुरावले आहेत. अंतर ठेवा, मात्र दूर जावू नका, असे आवाहन करण्याची वेळ आली आहे. एखाद्याला कोरोना झाला तर नात्यातील लोकही घाबरून दूर जात आहेत. या काळात माणुसकीच्या नात्याने काही संस्था, संघटना काम करत आहेत. त्यात जमियत आणि मदनी ट्रस्टचे कामही लक्षवेधी आहे. कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मयत झाली तर दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यासाठी ही टीम पुढे येत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक महिला आजारी होती. तिला मिरज आणि सांगलीमध्ये बेडसाठी फिरावे लागले.

हेही वाचा: व्हॅलेंटाईन अन्‌ ओंजळ रक्तफुलांची!

अखेर क्रीडा संकुल मिरज इथल्या कोविड सेंटरमध्ये बेड मिळाला, मात्र उपचार सुरू असताना तिचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह गावात नेण्याची तयारी केली. मात्र गावातील लोक खूपच घाबरलेले होते. त्यांनी मृतदेह इकडे आणू नका, तिकडेच अत्यसंस्कार करा, अशी विनंती केली. मृताच्या नातेवाईकांना या संकट काळात मदनी ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचा आधार मिळाला. मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियांन पठाण, ॲड. असिफ अत्तार, नईम पखाली, सलमान शेख यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

loading image
go to top