पन्हाळा-पावनखिंड मोहिमेत यंदा 20 मुस्लिम मावळ्यांचे पथक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

कोल्हापूर - पन्हाळा-पावनखिंड मोहिमेत यंदा 20 मुस्लिम तरूण मावळ्यांचे एक पथक सहभागी होणार आहे. त्यामुळे या मोहिमेला सामाजिक ऐक्‍याची एक आदर्श किनार जोडली जाणार आहे. करवीर हायकर्सतर्फे रविवारी(ता.21) रोजी होणाऱ्या या मोहिमेत "हम साथ साथ है' नारा देत सहभागी होणारे तरूण मोहिमेची उंची वाढवणार आहेत. काही वेगळे घडायची सुरवात कशी होते, याचेच हे उदाहरण ठरणार आहे. 

आसिफ बागवान, नासिर बागवान, सलिम अल्ताफ बागवान, झाकिर बागवान, डॉ. जमीर बागवान, नईम बागवान, अंजूम बागवान यांच्या नेतृत्वाखाली व करवीर हायकर्सच्या मार्गदर्शनाखाली माळवाडी ते पावनखिंड हा टप्पा हे सर्वजण पार करणार आहेत. 

यांना यापुर्वीच्या ट्रेंकिगचा अनुभव नाही. पण शिवरायांचा इतिहास, पावनखिंडीतील थरार व काही वर्षे कोल्हापुरातून निघणाऱ्या पन्हाळा -पावनखिंड मोहिमेबद्दल त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे ते करवीर हायकर्सच्या संपर्कात आले व या मोहिमेत एका टप्यापर्यंतचे अंतर सहभागी होण्यास तयार झाले. यात काही व्यावसायिक आहेत, डॉक्‍टर आहेत, शासकीय सेवक, विद्यार्थी आहेत. त्यांनी आपली नोंद मोहिमेसाठी केली आहे. पाऊस, चिखल, वारे, धुके याला तोंड देत पहिल्यांदाच अशा मोहिमेत गटाने सहभागी होण्याची त्यांनी तयारी केली आहे. 

शिवरायांचा इतिहास धगधगता आहे. त्यातला एक एक प्रसंग म्हणजे प्रेरणेचे प्रतिक आहे. पन्हाळ्याचा वेढा भेदून शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने केलेले साहस. त्यानंतर शिवा काशीद, बाजीप्रभु देशपांडे यांचे बलिदान हा रोमहर्षक इतिहास आम्हाला प्रत्यक्ष त्या मार्गावर जाऊन अनुभवायचा आहे. 
- आसिफ बागवान 

आमच्या करवीर हायकर्सच्या मोहिमेत मुस्लीम बांधव "हम साथ साथ है" चा नारा देत मोहिमेत सहभागी होत आहेत. मोहिमेला त्यामुळे नवा पैलू मिळणार आहे. 
- शिवाजी आडूळकर, दीपक सावेकर, संयोजक, करवीर हायकर्स 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim squad in Panhala Pavankhind trekking