स्वतंत्र उत्तर कर्नाटक झालेच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

माजी मंत्री उमेश कत्ती : भाजपच्या वतीने उद्या मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन

बेळगाव- उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे, या मागणीवर आपण ठाम असल्याचे माजी मंत्री उमेश कत्ती यांनी शनिवारी पुन्हा सांगितले. राज्याच्या स्थापनेपासून उत्तर कर्नाटकचा विकास झालेला नाही. आजही उत्तर कर्नाटक दुर्लक्षित आहे, त्यामुळे स्वतंत्र राज्य झाल्यास उत्तर कर्नाटकचा विकास होईल, असे ते म्हणाले.

माजी मंत्री उमेश कत्ती : भाजपच्या वतीने उद्या मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन

बेळगाव- उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे, या मागणीवर आपण ठाम असल्याचे माजी मंत्री उमेश कत्ती यांनी शनिवारी पुन्हा सांगितले. राज्याच्या स्थापनेपासून उत्तर कर्नाटकचा विकास झालेला नाही. आजही उत्तर कर्नाटक दुर्लक्षित आहे, त्यामुळे स्वतंत्र राज्य झाल्यास उत्तर कर्नाटकचा विकास होईल, असे ते म्हणाले.

या वेळी खासदार सुरेश अंगडी यानी मात्र सावध भूमिका घेतली. उत्तर कर्नाटकची मागणी हा कत्ती यांचा वैयक्तिक मुद्दा आहे, त्याला उत्तर कर्नाटकातील जनतेचा पाठिंबा नाही, असे खासदार अंगडी म्हणाले. कत्ती यांनी मात्र यापुढेही ज्या ज्या वेळी उत्तर कर्नाटकाचा मुद्दा उपस्थित होईल, त्या वेळी स्वतंत्र राज्याची मागणी केली जाईल, असे सांगितले.

शनिवारी शासकीय विश्रामधामात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी कत्ती, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विश्‍वनाथ पाटील यांनी दिली. मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी सिद्धरामय्या यांनी हायकमांडला 1 हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केला आहे. त्याबाबत अद्याप मुख्यमंत्र्यानी स्पष्टीकरण दिलेले नाही. शिवाय ते येडियुराप्पा यांचीच बदनामी करीत आहेत. त्यामुळेच माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर व माजी उपमुख्यमंत्री ईश्‍वराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 20) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कॉंग्रेस सरकार निद्रिस्त झाले आहे, दुष्काळी स्थिती भयावह स्वरूप घेत असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवेल. राज्यात भाजपची सत्ता येईल, असे कत्ती यांनी सांगितले. या वेळी इराण्णा कडाडी, माजी आमदार मनोहर कडोलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री, हेब्बाळकर यांनी राजीनामा द्यावा
जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी व महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या दोघांच्या निवासस्थानांवर प्राप्तिकर खात्याने छापा टाकला आहे. दोघांकडे मिळून 152 कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Must be independent of the North Karnataka