
प्रसारमाध्यम, नियतकालिके, टीव्ही, न्यूज चॅनेल इत्यादी कार्यालये, दूरसंचार, पोस्ट व इंटरनेट सेवा पुरविणाऱया आस्थापना, चिकन व अंडी दुकाने, जनावरांचे खाद्य खुराक विक्री दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतूक सेवा चालू राहील.
नगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील अंडी-मटणाचे दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे खवय्यांची चांगलीच अडचण झाली होती. काहीजणांनी मटणातही ब्लॅक सुरू केलं होतं. साडेपाचशे रूपये किलोने मिळणारे मटण थेट ९०० रूपये किलोने विकले जात होते. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांनीच अंडी-मटण, चिकनची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सामीष भोजन करणाऱ्यांची सोय झाली आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, बँक, एटीएम, विमा सेवा, अत्यावश्यक सेवा मधील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने,अॅम्बुलन्स, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅन्ड , बस थांबे व स्थानके, विमानतळ, रिक्षा थांबे, अत्यंविधी, अत्यावश्यक किराणा साहित्य, दूध दुग्धोत्पादने , फळे व भाजीपाला, औषधालय, एलपीजी गॅस वितरण सेवा, विहित वेळेत पेट्रोल पंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री वितरीत व वाहतूक करण्यास परवानगी राहील.
प्रसारमाध्यम, नियतकालिके, टीव्ही, न्यूज चॅनेल इत्यादी कार्यालये, दूरसंचार, पोस्ट व इंटरनेट सेवा पुरविणाऱया आस्थापना, चिकन व अंडी दुकाने, जनावरांचे खाद्य खुराक विक्री दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतूक सेवा चालू राहील.
कोरोना विषाणूचा प्रसार राेखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश १४ एप्रिलपर्यंत जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱया व्यक्ती, संस्था यांच्यावर १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा, कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठका, मिरवणुका, मेळावे, सभा, आंदोलने आदी करण्यास मनाई आहे.
कार्यक्षेत्रात असणारी दुकाने सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब-पब क्रीडांगणे, मैदाने जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा संग्रहालय बंद राहतील.