जास्तीत जास्त निधी देण्याचा माझा प्रयत्न : डोंगरे

राजकुमार शहा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मोहोळ : खंडाळी ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास दाखवुन मला मोठे सहकार्य केले. त्यामुळेच मी आज येथे उभा आहे. यापूर्वी विकास निधी हा ठराविक भागातच जात होता. मात्र, मी कोणताही दुजाभाव न करता सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अविकसित गावासाठी जेवढा निधी देता येईल. तेवढा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केले. 

खंडाळी (ता. मोहोळ) येथे 46 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी डोंगरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती समता गावडे उपसभापती साधना देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील संचालक प्रभाकर देशमुख पंचायत समिती सदस्या डॉ. प्रतिभा व्यवहारे सर्जेराव चवरे, अरूण कवडे, गणेश खुर्द, बालाजी खुर्द, बाळासो टेकळे, बबन वाघमारे, शामराव शिरसट, लक्ष्मण मुळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

डोंगरे म्हणाले, मला जे पद मिळाले आहे, ते केवळ जनतेच्या विश्वासामुळेच. या पदाचा जादा वापर हा लोकहितासाठीच होत आहे. राजकारणापेक्षा समाजकारण जादा या माझे वडील मनोहर डोंगरे यांच्या शिकवणीनुसार काम सुरू आहे. सर्वानी सहकार्य करावे. याप्रसंगी चंचल पाटील, प्रभाकर देशमुख, समता गावडे यांनी मनोगत व्यक्त केली 

ही आहेत लोकार्पण झालेली कामे 
 
* तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधुन सोना माता मंदिरा समोर पेव्हींग ब्लॉक बसविणे     3 लाख  
* डिपीडीसी मधुन खंडाळी ते शेटफळ रस्ता विविध चॅनेल         24 लाख  
* जनसुविधे अंतर्गत स्मशान भुमीत सीडी वर्क    2  लाख 
* दलीत वस्ती साठे नगर सभामंडप     7 लाख 
* साठे व आंबेडकर नगर येथे हाय मास्ट    6  लाख 
*  स्मशानभुमी सुशोभीकरण      3 लाख 
* गाव विहीर ते भाजीमंडई काँक्रीटीकरण    5 लाख 
* कोल्हापुर पद्घतीचे बंधारे कुरण विहीर ते जाधव वस्ती पर्यंत       17 लाख

Web Title: My efforts to give maximum funds says dongre