"माझे कुटुंब...' सर्वेक्षणाला  शिक्षकांचा विरोध, बहिष्कार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी', या राज्य शासनाने जारी केलेल्या उपक्रमात शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम लावल्याने शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सांगली ः "माझे कुटुंब, माझी जबाबदारी', या राज्य शासनाने जारी केलेल्या उपक्रमात शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम लावल्याने शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने या कामावर बहिष्कार टाकला आहे. शिक्षक समिती या प्रकाराच्या विरोधात असून प्राथमिक शिक्षक संघाने हे काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कालपासूनच ही मोहिम सुरु झाली आहे. 

राज्य शासनाने माझे कुटुंब उपक्रमाला राज्यभर सुरवात केली आहे. त्यात "घर टू घर' फिरून सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला नकार देत शिक्षक समितीने बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांनी सांगितले. ते म्हणाले, ""कोरोनाच्या कामकाजासाठी सेवा अधिगृहित केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आहे. असे असताना या नव्या कामाला शिक्षकांना लावणे, चुकीचे आहे. शासन आदेशाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यामुळे आम्ही त्याला विरोध केला आहे.'' 

शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव म्हणाले, ""शिक्षकांना याकामी लावणे हे चुकीचे आहे. आमचा याला विरोध राहील. एकही शिक्षक सर्वेक्षणात सहभाग घेणार नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "My family ..." Teachers oppose the survey, boycott