नागपंचमीचे आश्‍वासन मुख्यमंत्री पाळणार का? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

शिराळा - शिराळ्याच्या राजकारणातील  प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणारी वाकुर्डे योजना, शिराळची नागपंचमी व चांदोली पर्यटन याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याची उत्सुकता शिराळकरांना लागून राहिली आहे. चांदोली पर्यटनाबाबत मुंबईत एम.टी.डी.सी सोबत बैठक घेण्याबरोबरच शिराळा नागपंचमीबाबत केंद्रशासनाची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिराळा येथे ३१ डिसेंबर २०१६ रोजी विविध कामांच्या प्रारंभाच्या निमित्त आले असता जाहीर सभेत दिले होते.

शिराळा - शिराळ्याच्या राजकारणातील  प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणारी वाकुर्डे योजना, शिराळची नागपंचमी व चांदोली पर्यटन याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याची उत्सुकता शिराळकरांना लागून राहिली आहे. चांदोली पर्यटनाबाबत मुंबईत एम.टी.डी.सी सोबत बैठक घेण्याबरोबरच शिराळा नागपंचमीबाबत केंद्रशासनाची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिराळा येथे ३१ डिसेंबर २०१६ रोजी विविध कामांच्या प्रारंभाच्या निमित्त आले असता जाहीर सभेत दिले होते. नागपंचमीबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून शिराळकरांच्या आशा पल्लवित केल्या असल्या तरी आता आश्‍वासनापेक्षा थेट कृतीची गरज निर्माण झाली आहे.

नागपंचमीच्या मुद्द्यावरून बहिष्काराच्या गर्तेतून आता शिराळकर बाहेर आल्याने शिराळची नगरपंचायत निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत नागपंचमी हाच प्रचाराचा प्रमुख धागा पकडून तिन्ही राजकीय पक्षांकडून प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. मतदानासाठी आघाडी मिळवायची असेल तर भाजपकडून नागपंचमीसाठी काय घोषणा होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. महिला बचत गटांमार्फत उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजार पेठ मिळावी यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर मॉल सुरू करण्यात येणार असून त्यात फक्‍त महिला बचत गटांनीच तयार केलेली उत्पादने असतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी शिराळा येथे दिले होते. त्या आश्‍वासनांची पूर्ती कधी होणार याची उत्सुकता महिलांना लागून राहिली आहे. वाकुर्डे योजनेला गती मिळण्यासाठी २०० कोटींचा निधी दोन ते तीन टप्प्यात देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु तो निधी कधी मिळणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

Web Title: Nagapanchami's assurance will be the Chief Minister