नगर - तोडफोडीच्या गुन्ह्यातील 25 आरोपी हजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नगर - पोलिस अधिक्षक कार्यालयातील तोडफोडीच्या गुन्ह्यातील 25 आरोपी आज भिंगार पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. नगरसेवक आरिफ शेख, माजी नगरसेवक निखिल वारे यांच्यासह प्रमुख आरोपींचा त्यास समावेश आहे. आज दुपारनंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

सात मे रोजी या आरोपींविरुद्धचे कलम 308 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) तपासाअंती वगळण्यात आले होते. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या वेळी जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. तसेच जगताप यांना पोलिसांसमोरून उचलून नेले. त्याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांच्यासह 300 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 

या प्रकरणी सरकारी कामात अडथळा, सदोष मुनष्यवधाचा प्रयत्न (353, 333, 308) अशी गंभीर कलमे लावण्यात आली होती. 

Web Title: nagar 25 accused in the crime's