नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच - शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नगर - कोणी काहीही म्हटले, तरी नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच आहे. विभाजन होणार नसल्याचे सांगून काही जण आपला टीआरपी वाढवीत आहेत, अशा शब्दांत पालकमंत्री राम शिंदे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली. 

पालकमंत्री शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन होणार असल्याचे म्हटले होते. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यांना पूरक असे वक्तव्य केले होते. त्यामुळे जिल्हा विभाजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र जिल्हा विभाजनास विरोध दर्शविला आहे. त्यांचे पुत्र व आगामी लोकसभा निवडणुकीचे इच्छूक डॉ. सुजय विखे पाटील यांनीही जिल्हा विभाजनाच्या मुद्यावर शिंदे यांची खिल्ली उडविली आहे. जिल्हा विभाजनाचा प्रश्‍न तापलेला असतानाच पालकमंत्री व विखे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असतात हे अनेक वर्षे राजकारणात असणाऱ्यांना माहीत हवे, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे. 

Web Title: Nagar district will be divided ram Shinde