गुंडेगावकरांच्या प्रयत्नांमुळे सहा तासांनतर वणवा आटोक्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नगर - नगर तालुक्यातील गुंडेगाव हद्दीलगत असणा-या कोथूळ, भानगावच्या वनविभाग शिवारात आज मोठ्या प्रमाणात आग लागली. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा वणवा होता. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यांतील सात गावांमधील वनविभाग व खाजगी क्षेत्रातील जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. 

आग एवढी भयानक होती की त्या क्षेत्रातील सर्व झाडे, प्राणी, पक्षी, जीवजंतू जळून खाक झाले. या सर्व गावांची वनविगाची हद्द गुंडेगाव या गावास लागून आहे. परंतु गुंडेगावमधील तसेच विशेषकरून धावडेवाडी, आनंदमळा, चौधरीवाडी, श्रीगोंदा रोड, अरूण गव्हाने यांचे अकॅडमीतील तरूण मित्र तसेच गावातील तरूणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केला. जीवाची पर्वा न करता गुंडेगाव सहा किलोमीटर हद्दीलगतची आग सतत सहा तासांच्या अविरत प्रयत्नानंतर विझली. 

त्यामध्ये गुंडेगावमधील गवताची काडीही जळू दिली नाही. वन हद्दीलगत पाचव्यांदा अशाप्रकारे आग लागली आहे. या सर्व प्रसंगात गावातील सर्व २०० ते २५० तरूण सहकारी मित्रांनी वनांचे, गावचे रक्षण करून आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: nagar forest fire now in control

टॅग्स