नगरमध्ये शिकण्यासारखे बरेच काही - जिल्हाधिकारी द्विवेदी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नगर : नगर जिल्हा हा पुरोगामी आहे. शिवाय सहकार चळवळ या जिल्ह्याने देशाला दिली. हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात शिकण्यासारखे बरेच काही आहे, असे मत नगरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

द्विवेदी म्हणाले, "मी याआधी वाशीम जिल्ह्यात जिल्हा अधिकारी म्हणून काम केले आहे. वाशीम हा अमरावती विभागातील जिल्हे आहेत तर नगर हा नाशिक विभागातील जिल्हा आहे वाशीमच्या तीन ते चार पट नगर जिल्हा मोठा आहे.शासनाच्या योजना राबवण्यावर माझा भर राहणार आहे या योजनांचा जनसामान्यांना जास्तीत जास्त उपयोग करून देण्याचा मी प्रयत्न करेल. प्रथम मी लोकांशी भेटून वाचून नगर जिल्हा समजून घेण्याचा प्रयत्न करेल. नगर जिल्ह्यात अनेक नेते आहेत हे लोकशाहीचे लक्षण आहे लोकशाही मुळेच राजकारणात वैविध्य आहे.'' 

ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क 
"मी वाशिम मधील महसूल विभागातील ग्रामिण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत थेट संपर्क ठेवला होता. तो प्रयोग यशस्वी ठरला होता. तीच कार्यपद्धती येथेही वापरण्याचा मी प्रयत्न करीन. ग्रामीण भागातही काम करणारे कर्मचारी हे शासनाचे सैनिक आहेत,'' असेही द्विवेदी म्हणाले. 

Web Title: nagar has lots of thing which can learn said by collector rahul dwivedi