Nagar Loksabha 2019 : सुजय, संग्राममध्ये लढत; चारपर्यंत 44.27 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नगरमधील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नगर शहर 42.56, कर्जत-जामखेड 48.20, पारनेर 43.44, राहुरी 41.70, शेवगाव 47.00 आणि श्रीगोंदा 42.11 असे मतदान झाले आहे.

नगर  : नगर लोकसभा मतदार संघात आज (मंगळवार) सकाळपासून दुपारी चारपर्यंत 44.27 टक्के मतदान झाले असून, भाजपचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यात थेट लढत आहे.

नगरमधील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नगर शहर 42.56, कर्जत-जामखेड 48.20, पारनेर 43.44, राहुरी 41.70, शेवगाव 47.00 आणि श्रीगोंदा 42.11 असे मतदान झाले आहे.

ग्रामीण भागामध्ये मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसत होता. दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये आज सकाळी मशीन बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया उशिरा सुरू झाली. पाथर्डी तालुक्यातील करंजी, पारनेर तालुक्यातील काळेवाडी सावरगाव पारनेर शहर तालुक्यातील चांदवडी याठिकाणी उशिरा मतदान सुरू झाले तेथे नसल्याचे सांगण्यात आले होते.

रेनवडी येथे दीड तासाने उशिरा मतदान सुरू झाले. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत सर्वत्र सुरळीत मतदान सुरू होते. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Nagar Loksabha constituency voting begins Sujay Vikhe Patil and Sangram Jagtap fights