कोपर्डी खटला : आरोपीच्या वकिलांना जीवे मारण्याची धमकी

सूर्यकांत नेटके
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

अॅड. अाहेर यांनी भैलुमे ला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती.

नगर : कोपर्डी खटल्यातील तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याचे वकील प्रकाश अाहेर यांना एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्री साडेदहा वाजता जीवे मारण्याची धमकी दिली. अॅड. आहेर यांनी याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अॅड. अाहेर यांनी आरोपी भैलुमे याला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यामुळे धमकी देणाऱ्याने "आरोपीला न्यायालयात फाशीच द्यावी अशी मागणी करा अन्यथा जीवे मारू'' अशी मोबाईलवरून धमकी दिल्याचे प्रकाश आहेर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेवर आज सुनावणीसाठी होणार आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar marathi news kopardi rape case lawyer threatened