नगरः तलावाच्या पुरात 81 मेंढरे गेली वाहून

सनी सोनावळे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): पोखरी (ता. पारनेर) वऱ्हाणवाडी येथे बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने खरकवाडी तलावास आलेल्या पुरात कळपातील 81 मेंढर वाहुन गेली आहेत, अशी माहीती मंडलधिकारी अशोक लांडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहीती अशी की, हांडेवाडा (ता. पारनेर) येथील संतोष पिंगळे, अशोक ढोबाळे, बाळासाहेब पिंगळे, ज्ञानेश्वर सुळ, राहुल सुळ यांचा मेंढ्यांचा कळप या परीसरात चरत होता. तलाव भरून सांडव्यातून अचानक आलेल्या जोरदार पाण्यामुळे या कळपातील 81 मेंढर या पाण्यात वाहुन गेली. यामुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज (शनिवार) सकाळी टाकळी ढोकेश्वरचे मंडलधिकारी अशोक लांडे व तलाठी जे. वाय निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा त्वरीत पंचनामा करून या गरीब मेंढपाळांना मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: nagar news 81 goats carry water in the parner