नगर: मोटारींची समोरासमोर धडक; दहाजण गंभीर जखमी

हरिभाऊ दिघे
रविवार, 23 जुलै 2017

लोणी-नांदूरशिंगोटे रस्त्याने लोणीच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार (एमएच ४८, एफ २४९३ ) व नाशिकच्या दिशेने चालेलेल्या वॅगन आर कारची (एमएच १६ बीएच २२२९ ) तळेगाव शिवारात समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील लोणी-नांदूरशिंगोटे रस्त्यावर वॅगर आर-इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दहाजण गंभीर जखमी झाले. तळेगाव दिघे शिवारात आज (रविवार) सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

लोणी-नांदूरशिंगोटे रस्त्याने लोणीच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार (एमएच ४८, एफ २४९३ ) व नाशिकच्या दिशेने चालेलेल्या वॅगन आर कारची (एमएच १६ बीएच २२२९ ) तळेगाव शिवारात समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला. या अपघातात वॅगन आर कारमधील संदीप दिनकर पाठक (वय २६), कांचन अरुण मोहिते (वय ४६), किरण पाठक (वय २६), मैथिली पाठक (वय ६), अर्णव मोहिते (वय १९), अमेय मोहिते (वय २१ सर्व रा. केडगाव, अहमदनगर ) हे सहाजण गंभीर जखमी झाले. तर इनोव्हा कारमधील डॉ. संजीव काळे, डॉ. माया काळे, डॉ. कविता काळे व चालक मुन्ना यादव (रा. पनवेल, मुंबई) हे चारजण जखमी झाले. स्थानिक युवकांनी यावेळी मदतकार्य केले.

डॉ. जयंत सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय जीवनदायी (१०८) रुग्णवाहिकेतून जखमींपैकी चौघांना संगमनेर येथील डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित सहाजणांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सहायक फौजदार अशोक जांभूळकर यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. या अपघातात दोन्ही वाहनांची मोठी दुर्दशा झाली. याप्रकरणी फिर्यादीनंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सहायक फौजदार जांभूळकर यांनी सांगितले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Nagar news accident between two cars near Sangamner