संगमनेर : अज्ञात वाहनाच्या चाकाखाली चिरडून एकजण जागीच ठार

हरिभाऊ दिघे
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास भगवान पवार हे तळेगाव चौफुली परिसरातून पायी चालले होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. वाहनाचे चाक त्यांच्या पोट व छातीवरून गेले. वाहनाच्या चाकाखाली चिरडून ते जागीच ठार झाले. त्यानंतर अपघातास कारणीभूत वाहन घेवून चालक पसार झाला

तळेगाव दिघे - संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील चौफुलीवरील डांबरी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या चाकाखाली चिरडून एकजण जागीच ठार झाला. भगवान बाबुराव पवार ( वय ४४ ) असे मृताचे नाव आहे. काल (शनिवार) रात्री पावणे एकच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नगर - मनमाड रस्त्यावरील शिर्डीमार्गेची अवजड वाहतूक तळेगाव दिघेमार्गे वळविण्यात आलेली आहे. शनिवारी रात्री पावणेएकच्या सुमारास भगवान पवार हे तळेगाव चौफुली परिसरातून पायी चालले होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. वाहनाचे चाक त्यांच्या पोट व छातीवरून गेले. वाहनाच्या चाकाखाली चिरडून ते जागीच ठार झाले. त्यानंतर अपघातास कारणीभूत वाहन घेवून चालक पसार झाला.

तळेगाव चौफुलीवरील स्थानिक रहीवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत पोलीसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. ग्रामीण रुग्णालयाच्या रिपोर्टनुसार याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजि. क्र. ७४ / २०१७ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बाळासाहेब घोडे अधिक तपास करीत आहे.

पवार यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: nagar news; accident death