नगर, श्रीरामपुरला दगडफेक; वाहने,एसटीचे नुकसान

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 2 जानेवारी 2018

भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला. नगर शहरातील माळीवाडा
बसस्थानकासह परिसर, कायनेटीक चौक, रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात एसटी
गाड्यावर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. बाजार समिती परिसरात खाजगी
वाहनेचही नुकसान करण्यात आले

नगर - सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ
वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे पडसाद आज
(मंगळवारी) नगर शहरासह जिल्ह्यात उमटले. नगरमधील माळीवाडा बसस्थानक
परिसर, बाजार समिती परिसरासह अनेक ठिकाणी दगडफेक झाली. दगडफेकीत
वाहनाच्या, एसटीच्या काचा फोडण्यात आल्याने अनेक वाहनाचे नुकसान झाले
आहे. जिल्हाभरातही अनेक ठिकाणी दगडफेक झाली. बंद पाळण्यात आला. शहरासह
जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासून तणाव होता.

भिमा-कोरेगाव येथे सोमवारी (ता. 1) झालेल्या दगडफेक, तोडफोड आणि
जाळपोळीचे पडसाद शहरात उमटले. सोमवारी रात्रीच भिंगार शहरातील
कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून बंद पाळणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार आज भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला. नगर शहरातील माळीवाडा
बसस्थानकासह परिसर, कायनेटीक चौक, रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात एसटी
गाड्यावर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. बाजार समिती परिसरात खाजगी
वाहनेचही नुकसान करण्यात आले. वाडीयापार्क परिसरात वाहनांवर दगडफेक
करण्यात आली. काही तरुणांनी नगर शहरातून दुचाकीवरुन घोषणाबाजी करीत शहरात
फिरत व्यावसायिकांना दुकाने बंद करायला लावली. श्रीरामपूरमध्ये बंद
पाळण्यात आला आला. येथे बसस्थानक परिसरात दगडफेक करण्यात आली. राहाता व
अन्य ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. कार्यकर्त्यांनी कालच्या प्रकाराचा
निषेध करत निषेध सभा घेतल्या.

दगडफेकीमुळे एसटीगाड्या बसस्थानकाबाहेर नेल्या जात नसल्याने अनेक प्रवासी शहरातील तीनही बसस्थानकावर अडकून पडले होते. नगर, श्रीरामपुरमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून नगर, श्रीरामपुरसह जिल्हाभरात पोलिस बंदोबस्त वाढवला. 

Web Title: nagar news: agitation