'एशियन ओशानियन'च्या उपाध्यक्षपदी शिवाजी झावरे यांची निवड 

सनी सोनावळे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

अद्यावत आंतरराष्ट्रीय हिशोब प्रणाली व आंतरराष्ट्रीय संस्थांना या बाबतीत सल्ला देणारी एकमेव संस्था आहे.

टाकळी ढोकेश्वर : गारगुंडी (ता. पारनेर) येथील सीए शिवाजी झावरे यांची अशिया खंडामधील एशियन ओशानियन स्टँडर्ड सेंटर (एओएसएसजी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अंकोंटंट्स आॅफ इंडीया (आयसीएआय) नवी दिल्ली यांचे प्रतिनीधी म्हणून निवड झाली आहे.

अशिया खंड सागरी पट्टयामधील २६ देशांमधून २००९ साली प्रस्थापित झालेली संस्था आहे. ही संस्था अद्यावत आंतरराष्ट्रीय हिशोब प्रणाली व आंतरराष्ट्रीय संस्थांना या बाबतीत सल्ला देणारी एकमेव संस्था आहे. झावरे यांना चीन, ऑस्ट्रेलिया या देशांच्या सरकारनेही याबाबत अधिकृत पत्र दिले आहे. या पदासाठी भारतामधुन प्रथमच दोन वर्षे व नंतरची दोन वर्षे अध्यक्षपदी काम करण्याचा मान झावरे यांना मिळाले आहे.

झावरे हे आयसीएआयच्या केंद्रीय मंडळाचे सभासद असून भारताच्या हिशोब नियामक मंडळाचे मानद अध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल ग्रामस्थ व गारगुंडी ग्रामविकास मंचाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news asian oceanian standard center shivaji zavare