नगरः युवकावर चॉपरने जीवघेणा हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा

हरिभाऊ दिघे
सोमवार, 10 जुलै 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) : रात्रीच्यावेळी नाचत असताना अंगावर येत धक्का लागल्याच्या कारणावरून वादावादी होत एका युवकावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी (ता. 9) रात्री साडेबाराच्या सुमारास कौठेकमळेश्वर (ता. संगमनेर) शिवारात ही घटना घडली.

तळेगाव दिघे (जि. नगर) : रात्रीच्यावेळी नाचत असताना अंगावर येत धक्का लागल्याच्या कारणावरून वादावादी होत एका युवकावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी (ता. 9) रात्री साडेबाराच्या सुमारास कौठेकमळेश्वर (ता. संगमनेर) शिवारात ही घटना घडली.

संगमनेर येथील काही युवक गुरुपोर्णिमेनिमित्त शिर्डी येथे रविवारी रात्री जात होते. दरम्यान कौठेकमळेश्वर शिवारात नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून प्रवीण राजेंद्र गायकवाड (रा. शिवाजीनगर, संगमनेर) व गणेश मारुती पर्बत (रा. रंगारगल्ली, संगमनेर) यांच्यात रात्री साडेबाराच्या सुमारास वाद झाला. आरोपी गणेश पर्बत याने प्रवीण गायकवाड याच्या उजव्या हाताच्या कोपरावर व उजव्या पायावर चॉपरने हल्ला करून जखमी केले, अशी तक्रार प्रवीण गायकवाड याने पोलिसांत दिली. त्यानुसार आरोपी गणेश पर्बत विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला आहे. सहायक फौजदार अशोक जांभूळकर अधिक तपास करीत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: nagar news attack on youth, filed the police complaint