भंडारदराः देवगिरी कॉलेजचे 70 विद्यार्थी थोडक्यात बचावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

भंडारदराः भंडारदरा पाहण्यासाठी आलेल्या देवगिरी कॉलेज औरंगाबाद विद्यार्थ्यांच्या बसचे स्टिअरींग वळणावर सरळ न झाल्याने धरणाच्या पायथ्याशी असलेल्या उतारावर एका कठड्याला बस अडकल्याने बस दरीत न जात अडकून राहिल्याने ७० विद्यार्थी थोडक्यात बचावले. यावेळी आजूबाजूच्या पर्यटकांनी मदतीसाठी धाव घेतली.

भंडारदराः भंडारदरा पाहण्यासाठी आलेल्या देवगिरी कॉलेज औरंगाबाद विद्यार्थ्यांच्या बसचे स्टिअरींग वळणावर सरळ न झाल्याने धरणाच्या पायथ्याशी असलेल्या उतारावर एका कठड्याला बस अडकल्याने बस दरीत न जात अडकून राहिल्याने ७० विद्यार्थी थोडक्यात बचावले. यावेळी आजूबाजूच्या पर्यटकांनी मदतीसाठी धाव घेतली.

औरंगाबाद येथील देवगिरी कॉलेजचे ७० विधार्थी व शिक्षक स्वामी समर्थ ट्रॅव्हल्सच्या (बस क्रमांक एम एच ०४-७२१६) बसने आज (शुक्रवार) भंडारदरा पाहण्यासाठी आले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेंडी गावाकडून भंडारदरा धरणाच्या पायथ्याजवळील गार्डनकडे जाण्यासाठी निघालेली बस एका वळणावर स्टेरिंग सरळ राहिल्याने ती सरळ कठड्यावर जाऊन आदळली. चालकाने प्रसंगावधान राखून बसवर ताबा मिळवून विद्यार्थ्यांना बस मधून खाली उतरण्यास सांगितले. बसच्या मागील टायरखाली दगड टाकून बस स्थिर केली. यावेळी आजूबाजूचे पर्यटकही बसकडे धावले. त्यांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केली.

बसवर ताबा मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. कारण खाली खोल दारी व धरणातून सोडण्यात आलेले पाणी प्रवरा नदी भरभरून वाहत होती. बस सरळ नदीत गेली असती असे उपस्थित विद्यार्थी कपिलदेव नाईक, ऐश्वर्या मुठे, ऐश्वर्या परब, आकाश जाधव आदींनी सांगितले. आम्ही चालकाच्या तत्परतेमुळे वाचलो असेही त्यांनी सांगितले. सध्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत असून, रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: nagar news bhandardara 70 students of Devagiri College rescued briefly