नगरच्या अर्थसंकल्पी महासभेस 38 नगरसेवकांची दांडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नगर - महापालिकेची अर्थसंकल्पी महासभा आज गणसंख्येअभावी 25 मिनिटे खोळंबली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आरीफ शेख व भाजप नगरसेविका मालन ढोणे सभागृहात उशिरा आल्यानंतर गणसंख्येचा 25चा आकडा पूर्ण झाल्यनंतर सभेला प्रारंभ झाला; मात्र 72 पैकी 38 नगरसेवक सभागृहाकडे फिरकलेही नाहीत. महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता अर्थसंकल्पी महासभा बोलावली होती. तथापि, सभागृहात पावणेअकरा वाजेपर्यंत मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. त्यावर कैलास गिरवले यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यावर थोडा वेळ वाट पाहण्याची भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर 10 वाजून 53 मिनिटांनी आणखी दोघे जण आल्यानंतर गणंसख्या पूर्ण झाली.
Web Title: nagar news budget meeting corporator