नगर: पारनेरजवळ बसला अपघात; 15 जण जखमी

सनी सोनावळे
रविवार, 13 ऑगस्ट 2017

भिमाशंकरहून औरंगाबाद जात असलेली ही खासगी बस टाकळी ढाकेश्वर येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास पलटली. बसमध्ये एकूण 55 प्रवासी होते. यातील 15 जण जखमी झाले असून, जखमींना टाकळीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) बायपास चौकात खाजगी आरामबस पलटी झाल्याने झालेल्या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिमाशंकरहून औरंगाबाद जात असलेली ही खासगी बस टाकळी ढाकेश्वर येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास पलटली. बसमध्ये एकूण 55 प्रवासी होते. यातील 15 जण जखमी झाले असून, जखमींना टाकळीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये मुंबई येथील रहिवासी असलेल्या केरळच्या भाविकांचा समावेश आहे. हे सर्वजण भिमाशंकरहून दर्शन घेऊन औरंगाबादकडे जात होते. महामार्गावर वळण्याचा कोणताही बोर्ड नाही आणि त्याठिकाणी एल आकाराचा कॉर्नर आहे त्यामुळे याठिकामी कायम अपघात होतात.

Web Title: Nagar news bus accident near Parner