रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे रास्तारोको

संगमनेर ते अकोले डांबरी रस्ता खड्डेमय; काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
संगमनेर ते अकोले डांबरी रस्ता खड्डेमय; काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

संगमनेर ते अकोले डांबरी रस्ता खड्डेमय; काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

तळेगाव दिघे (जि. नगर) : कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील संगमनेर ते अकोले या भागात डांबरी रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसाठी मोठी अडचण होत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तातडीने संगमनेर ते अकोले या डांबरी रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे व बाळासाहेब देशमाने यांच्या नेतृत्वाखाली चिखली (ता. संगमनेर) येथे आज (बुधवार) सकाळी दोन तास रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.

चिखली (ता. संगमनेर) येथे आज सकाळी ९ वाजता झालेल्या या रास्तारोको आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सदस्य रामहारी कातोरे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, सतिष कानवडे, बाळासाहेब देशमाने, बाळासाहेब मोरे, विलास कवडे, अनिल देशमुख, विष्णू राहटळ, अर्जुन लांडगे, दत्ता कासार, अवधूत आहेर, शिवाजी रहाणे, भास्कर सिनारे, रमेश गुंजाळ, वसंतराव पवार, दत्तु कोकणे, रमेश नेहे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुमारे दोन तास झालेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रामहरी कातोरे म्हणाले, संगमनेर-अकोले हा दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेसाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मिटींग घेवून हे काम सुरु करावे यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, शासनाने अजूनही या कामाला सुरुवात केली नाही. सणसुद, वाढती वाहने, मोठमोठे खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून यास प्रशासन जबाबदार आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार लेखी व तोंडी निवेदनही देण्यात आले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कुठलीही दखल घेतली नाही. या रस्त्यांची प्रलंबीत कामे तातडीने सुरु करावे अन्यथा पंधरा दिवसानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा ही यावेळी देण्यात आला.

अजय फटांगरे म्हणाले, संगमनेर-कळस रस्त्यावर तालुक्यातील पश्‍चिम भागातील नागरिकांची सातत्याने मोठी वर्दळ आहे. मात्र, रस्ता कमी आणि खड्डे जास्त असलेल्या या महामार्गावर अपघाताचे वाढलेले प्रमाण हे अतिशय गंभीर आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त झालाच पाहिजे असे ही ते म्हणाले.

सतिष कानवडे म्हणाले, भाजप सरकार फक्त घोषणाबाजी करत आहे. मात्र, कुठे रस्ता नाही कुठे धरण नाही. शेती मालाला हमीभाव नाही. वाढलेली बेरोजगारी यामुळे शासनाचा गोंधळ झाला आहे. हा रस्ता तातडीने सुरु करावा अन्यथा अधिकार्‍यांना तालुक्यात फिरु देणार नाही.

बाळासाहेब देशमाने, विलास कवडे, बाळासाहेब मोरे, अंजन लांडगे, अवधूत आहेर, शिवाजी सहाणे, नवनाथ अरगडे, रमेश गुंजाळ, वसंतराव पवार, दत्ता कासार यांचीही भाषणे झाली. यावेळी भाऊसाहेब हासे, तुळशीराम सिनारे, सतीश शेटे, सिताराम देशमुख, तुळशीराम सिनारे, आण्णासाहेब कानवडे, गणेश हासे, नवनाथ कातोरे, महेश कर्पे, बाळासाहेब खर्डे, संजय वाळे, बादशाह वाळुंज, आत्माराम हासे, सोमनाथ भोकनळ, विक्रांत देशमुख, सागर हासे उपस्थित होते. प्रसंगी उपअभियंता अविनाश पाटील यांनी निवेदन स्विकारुन पंधरा दिवसांत काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी पश्‍चिम भागातील विविध गावांमधील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com